शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: असा शोधला न सापडणाऱ्या जनुकातून ओमायक्रॉन, कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 09:31 IST

Coronavirus omicron variant : नोव्हेंबर महिन्याच्या प्रारंभी दक्षिण आफ्रिकेतील गौटेंग प्रांतात एक निराळीच घटना घडली. कोरोना विषाणूतील स्पाईक प्रोटीन तयार करणारे जनुक चाचण्यांमध्ये सापडेनासे झाले. त्याचबरोबर थकवा व डोकेदुखीच्या तक्रारी घेऊन अनेक रुग्ण डॉक्टरांकडे येऊ लागले.

जोहान्सबर्ग : नोव्हेंबर महिन्याच्या प्रारंभी दक्षिण आफ्रिकेतील गौटेंग प्रांतात एक निराळीच घटना घडली. कोरोना विषाणूतील स्पाईक प्रोटीन तयार करणारे जनुक चाचण्यांमध्ये सापडेनासे झाले. त्याचबरोबर थकवा व डोकेदुखीच्या तक्रारी घेऊन अनेक रुग्ण डॉक्टरांकडे येऊ लागले. त्यामुळे शास्त्रज्ञांनी अधिक सखोल संशोधन करून ओमायक्रॉन हा नवा विषाणू शोधून काढला व त्याच्या अस्तित्वाची माहिती २५ नोव्हेंबरला जागतिक आरोग्य संघटनेने साऱ्या जगाला दिली.दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग, प्रिटोरिया येथे डेल्टा विषाणूने जुलै महिन्यात हाहाकार माजविला होता. त्यानंतर अनेक आठवडे तिथे कोरोना साथ काही प्रमाणात निवळली होती. मात्र तिथेही ओमायक्रॉनचे अस्तित्व आढळून आल्याने घबराट निर्माण झाली. हे भय नंतर साऱ्या जगात पसरले. सध्या दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉनच्या संसर्गाने हातपाय पसरले आहेत. ब्रिटन, अमेरिकेसहित अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांना प्रवेशबंदी केली आहे. 

बोत्सवाना, हाँगकाँगमध्येही घबराटनोव्हेंबरच्या प्रारंभी बोत्सवाना देशातही एका नमुन्यामध्ये कोरोना विषाणूतील स्पाईक प्रोटीन निर्माण करणारे जनुक सापडत नव्हते. दक्षिण आफ्रिकेहून हाँगकाँगला आलेल्या एका नागरिकातील विषाणू नमुन्यातही हाच प्रकार आढळला होता. त्या रुग्णाचे लगेच विलगीकरण करण्यात आले. त्यामुळे त्या देशातही घबराट पसरली. तिथेही ओमायक्राॅनचे अस्तित्व आढळले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉनInternationalआंतरराष्ट्रीयHealthआरोग्य