शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: नेदरलँडमध्ये ओमिक्रॉनची १३ प्रवाशांना बाधा, जर्मनी, इटलीमध्येही नव्या विषाणूचा प्रसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 07:04 IST

Coronavirus: ओमिक्रॉन विषाणूचा जगभरात झपाट्याने प्रसार होत आहे. नेदरलँडमध्ये या विषाणूने बाधित झालेले १३ रुग्ण आढळले, तर जर्मनी, इटलीमध्येही ओमिक्राॅनचे अस्तित्व आढळले आहे.

हेग : ओमिक्रॉन विषाणूचा जगभरात झपाट्याने प्रसार होत आहे. नेदरलँडमध्ये या विषाणूने बाधित झालेले १३ रुग्ण आढळले, तर जर्मनी, इटलीमध्येही ओमिक्राॅनचे अस्तित्व आढळले आहे. त्यामुळे जग धास्तावले असून, आफ्रिकेतील प्रवाशांवर बंदी घालणाऱ्या देशांची संख्या वाढत चालली आहे. आतापर्यंत नऊ देशांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. नेदरलँड येथे शुक्रवारी ॲमस्टरडॅम येथे दोन विमानांतून आलेल्या प्रवाशांपैकी ६१ जण कोरोनाबाधित आढळले. त्यातील १३ जणांना ओमिक्रॉनची बाधा झाली आहे. या सर्व रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. नव्या विषाणूचा युरोपमधील वाढता प्रसार बघता इंग्लंडने नागरिकांना मास्क घालणे  बंधनकारक केले आहे. दुकानात खरेदीसाठी जाताना, प्रवास करताना नागरिकांनी मास्क घातलाच पाहिजे, शारीरिक अंतर राखण्याच्या सूचना ब्रिटन सरकारने दिल्या आहेत. विदेशी प्रवासी इंग्लंडमध्ये आल्यानंतर त्यांची आरटी-पीसीआर चाचणी करण्याचेही आदेश सरकार लवकरच देणार आहे. 

चीनने निर्बंध सैल केल्यास भीषण स्थितीकोरोना साथ सुरू असताना अमेरिका, फ्रान्सने अनेक निर्बंध शिथिल केले होते. तसा निर्णय चीनने घेतला तर तिथे दरदिवशी कोरोनाचे सुमारे सहा लाख तीस हजार नवे रुग्ण आढळू शकतील, असा इशारा एका अभ्यासातून देण्यात आला. पेकिंग विद्यापीठाच्या गणित विभागाने यासंदर्भात केलेल्या अभ्यासाच्या निष्कर्षात म्हटले आहे की, चीनच्या प्रयत्नांत थोडी जरी ढिलाई झाली तरी विपरीत स्थिती निर्माण होऊ शकते.

लक्षणे मध्यम स्वरूपाची ओमिक्रॉनमुळे मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या कोरोनाची बाधा होईल, असे मत साऊथ आफ्रिकन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. अँगेलिक्यू कोएत्झी यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, ओमिक्रॉनच्या बाधेमुळे रुग्णाचे स्नायू एक-दोन दिवस दुखतील व त्याला थकवा जाणवेल. थोडासा कफ होईल. मात्र, त्यांच्या तोंडाची चव जाणे किंवा वास न येणे, या समस्या त्यांना नसतील.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन