शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
3
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
4
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
5
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
6
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
7
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
8
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
9
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
10
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
11
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
12
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
13
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
14
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
15
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
16
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
17
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
18
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
19
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस

CoronaVirus News: जगात कोरोना पसरण्याआधी चीनच्या 'त्या' लॅबमध्ये काय घडलं?; धक्कादायक माहिती उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 08:36 IST

CoronaVirus News: चीनमधील वुहान लॅबमध्ये धक्कादायक माहिती उघडकीस; जगात खळबळ

वॉशिंग्टन: गेल्या दीड वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना संकटाचा सामना करत आहे. कोरोनामुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला असून यामुळे अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. कोरोना विषाणू नेमका कुठून आणि कसा पसरला, याचं नेमकं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. मात्र चीनच्या वुहान प्रांतात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होत्या. वुहानमधील एका प्रयोगशाळेतून कोरोनाचा विषाणू पसरल्याचा संशय अनेकांना आहे. यावर लवकरच शिक्कामार्तब करणारा एक वृत्त प्रसिद्ध झालं आहे.तिसरी लाट मुलांना धोक्याची असल्याचे पुरावे नाहीत, डॉक्टर्स, तज्ज्ञांचे एकमत अमेरिकेच्या एका गोपनीय अहवालानुसार जगात कोरोनाची महामारी पसरण्याच्या एका महिन्यापूर्वी वुहान लॅबमधील तीन संशोधक आजारी पडले होते. अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलनं याबद्दलचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 'वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजीचे तीन संशोधक नोव्हेंबर २०१९ मध्ये आजारी पडले होते. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयाची आवश्यकता भासली होती,' असं वॉल स्ट्रीट जर्नलनं वृत्तात म्हटलं आहे. या वृत्तात वुहानच्या लॅबमधील आजारी संशोधकांची संख्या, ते केव्हा आजारी पडले आणि त्यांनी रुग्णालयात कधी उपचार घेतले याबद्दलची सविस्तर माहिती आहे.वुहानमध्येच कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. वुहानमधील लॅबमधून जाणूनबुजून कोरोनाचा विषाणू सोडण्यात आला असा संशय अनेकांना आहे. आता वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तामुळे संशय आणखी वाढला आहे. कोरोना विषाणूचा उगम नेमका कुठे झाला याबद्दलची पुढील चर्चा करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेची बैछक होण्याच्या एक दिवस आधीच हे वृत्त प्रसिद्ध झालं आहे. अमेरिकेच्या सुरक्षा परिषदेच्या प्रवक्त्यांनी या वृत्तावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र बायडन प्रशासन कोरोनाच्या उगमाच्या तपासाबद्दल अतिशय गंभीर असल्याचं त्यांनी सांगितलं.काही महिन्यांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेचं एक पथक वुहानला गेलं होतं. कोरोनाचा विषाणू वुहानमधून कसा पसरला याचा शोध घेण्याची जबाबदारी या पथकावर होती. कोरोना विषाणू वुहानच्या लॅबमधून जगभरात पसरला याचे पुरेसे पुरावे मिळाले नसल्याचं या पथकानं सांगितलं. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना विषाणूचा उल्लेख अनेकदा चिनी विषाणू आणि वुहान विषाणू असा केला आहे. त्यावरून चीननं आक्षेप नोंदवला होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन