शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: ...म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाची माहिती लपवली; अमेरिकेने केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 11:24 IST

CoronaVirus Marathi Latest News: जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे.

चीनमधील वुहान शहरातील प्रयोगशाळेत कोरोनाच्या विषाणूची निर्मिती करण्यात आली व तेथील एका अपघाताने हा विषाणू वातावरणात मिसळला असा दावा अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. तसेच चीनमध्ये कोरोनाच्या साथीचा उद्भव कसा झाला व ती साथ जगभरात कशी पसरली याचा अमेरिका सखोल तपास करत आहे असल्याचे डोनल्ड ट्रम्प यांनी सांगितले होते. यानंतर आता चीनने धमक्या दिल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना संर्दभातली माहिती लपवून ठेवल्याचा धक्कादायक आरोप अमेरिकेने केला आहे.

अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा म्हणजेच सीआयएने दावा केला आहे की, चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाची माहिती कशी लपवली आणि दोघांनी नक्की कोणत्या प्रकारची योजना आखली होती यासंर्दभातील सर्व पुरावे आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने जर कोरोनाची माहिती ताबडतोब जाहीर केली तर आम्ही कोरोना संक्रमणाच्या तपासणीत सामिल होणार नाही, अशी चीनने धमकी दिली होती. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाबाबत जगाला अलर्ट करण्यात उशिर केला असा आरोप अमेरिकेने केला आहे.

चीनमधून फैलावलेल्या कोरोनाच्या साथीने जगभर धुमाकूळ घातला असून, दोन लाखांहून अधिक लोक मरण पावले आहेत. प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. एखाद्याच्या चुकीमुळे जर अनेकांचा जीव जात असेल तर त्या कृत्याचा संबंधितांना जाब विचारायलाच हवा. पण जागतिक आरोग्य संघटनेने असे काहीही केले नाही. चीनच्या बाजूने बोलत राहाण्यात या संघटनेने धन्यता मानली असल्याचे सांगत डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर देखील नाराजी दर्शवली होती. 

जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 14 लाख 8 हजारांवर गेली आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोनाच्या केसेस अमेरिकेत आहे.तर एक चतुर्थांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत.  अमेरिकेत  गेल्या 24 तासात 1630 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकुण कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णंची संख्या 83  हजार 425 वर पोहोचली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पchinaचीनWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना