शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

CoronaVirus News: ऑक्सफर्डहून आली 'लय भारी' बातमी; यशस्वी होतेय कोरोना लसीची मानवी चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 20:18 IST

ऑक्सफर्डची कोरोनावरील लस सुरक्षित असल्याचं समोर आलंय

लंडन: जगातील कोरोना रुग्णांची संख्या अतिशय झपाट्यानं वाढत आहे. त्यामुळे कोरोनावरील लस शोधण्याचे प्रयत्न संपूर्ण जगात सुरू आहेत. त्यात ऑक्सफर्ड विद्यापीठानं आघाडी घेतल्याचं दिसत आहे. ऑक्सफर्डनं तयार केलेली लस सुरक्षित असल्याचं मानवी चाचण्यांमधून समोर आलं आहे. ऑक्सफर्डनं तयार केलेली लस पूर्णपणे यशस्वी ठरल्यास त्याचा मोठा फायदा भारताला होईल. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं या लसीच्या उत्पादनासाठी महत्त्वाचा करार केला आहे. त्यामुळे या लसीचं उत्पादन भारतात होईल. त्या दृष्टीनं आवश्यक असलेली मानवी चाचणी पुढील महिन्यापासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सीरमकडून देण्यात आली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठानं तयार केलेल्या कोरोना लसीची सध्या मानवी चाचणी सुरू आहे. शेकडो जणांना ही लस टोचण्यात आली. त्यातून समोर आलेले निष्कर्ष दिलासादायक असल्याची माहिती ब्रिटिश मेडिकल जर्नल लॅन्सेटनं दिली आहे. ऑक्सफर्डनं तयार केलेल्या लसीला शरीरातल्या रोगप्रतिकार यंत्रणेकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं लॅन्सेटनं म्हटलं आहे. सध्या तरी या लसीचे कोणतेही गंभीर साईड इफेक्ट्स दिसले नसल्याचं लॅन्सेटनं सांगितलं आहे.१८ ते ५५ वयोगटातील व्यक्तींना लस देण्यात आल्यावर त्यांच्या शरीरातील रोगप्रतिकार यंत्रणेकडून अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातून मिळालेला प्रतिसाद चांगला आहे, अशी माहिती ऑक्सफर्ड विद्यापीठातल्या जेन्नर इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. ऍड्रियन हिल यांनी दिली. विषाणूचा सामना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अँटीबॉडीजची निर्मिती करण्याचं काम लस करत आहे. यासोबतच लसीची शरीरातील टी-सेल्ससोबत रिऍक्शन होते. त्यामुळे कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यात मदत होते, असं हिल्स यांनी सांगितलं. ऑक्सफर्डनं तयार केलेल्या लसीची तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी सुरू मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. एकट्या अमेरिकेत या लसीची चाचणी जवळपास ३० हजार लोकांवर करण्यात आली आहे. ही लस जगभरात वापरली जाऊ शकते का, याची माहिती येत्या वर्षाच्या अखेरपर्यंत उपलब्ध होईल, असा अंदाज हिल यांनी वर्तवला. या लसीची चाचणी घेण्यात आलेल्या व्यक्तींच्या शरीरात कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तींच्या शरीरात इतक्याच अँटीबॉडीज तयार होत असल्याचं हिल यांनी सांगितलं. 

भारताच्या सीरम इन्स्टिट्यूटची भूमिका महत्त्वाची ठरणारऑक्सफोर्ड विद्यापीठ अस्ट्राझेनेकाच्या मदतीनं कोरोनाची लस तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या या लसीच्या उत्पादनात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यासाठी सीरमला डीजीसीआयनं परवानगी दिली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठानं तयार केलेल्या लसीची मानवी चाचणी सध्या सुरू आहे. ही लस दुहेरी ढाल म्हणून काम करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. ऑक्सफर्डनं निर्माण केलेली कोरोना रुग्णाच्या शरीरात अँटीबॉडीज आणि टी सेल्स तयार करेल. लसीमुळे शरीरात गेलेल्या अँटीबॉडीज काही महिन्यांत नष्ट होतील. मात्र टी सेल्स काही वर्षे कायम राहतील, असं प्राथमिक चाचण्यांमधून दिसून आलं आहे.लस सर्वांपर्यंत पोहोचायला वेळ लागणारऑक्सफर्डनं कोरोनावरील लस शोधल्यास सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तिचं उत्पादन सुरू करण्यात येईल. मात्र ही लस प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचेपर्यंत बराच कालावधी जाईल, असं सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांनी म्हटलं आहे. 'कोरोनावरील लसीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात करावं लागेल. त्यातही परवाना मिळालेली पहिली लस सर्वोत्तम असेलच असं नाही', असं पूनावाला यांनी 'इंडियन एक्स्प्रेस'ला सांगितलं....म्हणून सर्वांना लस मिळेपर्यंत बराच वेळ लागणार; सीरमच्या पूनावालांनी सांगितली मोठी अडचण

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या