शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोनाग्रस्त रुग्णांवर हे औषध ठरतंय 'रामबाण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 06:37 IST

या औषधानं रुग्णांच्या प्रकृतीत खूप चांगला फरक पडल्याचे दिसून आले.

वॉशिंग्टन : कोरोना साथीची लागण झालेल्या रुग्णांवरील उपचारांत रेमडेसिव्हिर हे विषाणू प्रतिबंधक औषध अत्यंत उपयोगी ठरणार असल्याची चिन्हे त्यासंदर्भातील प्रयोगांतून दिसून आली आहेत. यासंदर्भात संसर्गजन्य रोग या विषयातील अमेरिकी तज्ज्ञ अँथनी फौसी यांनी म्हटले आहे की, कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन प्रकृती गंभीर बनलेल्या रुग्णांपैकी काही जणांना रेमडेसिव्हिर हे औषध पाच दिवस, तर काही जणांना दहा दिवस देण्यात आले.या रुग्णांच्या प्रकृतीत खूप चांगला फरक पडल्याचे दिसून आले. रुग्ण बरे होण्यात रेमडेसिव्हिर हे औषधही गुणकारी ठरले. पाच दिवस रेमडेसिव्हिर औषध घेणाऱ्या कोरोना रुग्णांच्या प्रकृतीत जितकी सुधारणा झाली होती, तेवढेच प्रमाण हे औषध १० दिवस घेणाºया रुग्णांमध्येही आढळून आले होते. अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया येथील गिलिड सायन्सेस ही कंपनी कोरोना रुग्णांवर रेमडेसिव्हिर औषधाच्या चाचण्या करत आहे. रेमडेसिव्हिर हे औषध घेतल्यानंतर रुग्णाच्या प्रकृतीत किती सुधारणा झाली त्याचे निरीक्षण करण्यात आले. त्यावरून हे औषध कोरोनावर किती गुणकारी आहे हे ठरविण्यात येत आहे. हे औषध घेण्यास सुरुवात केल्यानंतर रुग्णाच्या श्वसनक्रियेत सुधारणा झाली. तर काही लोक पूर्णपणे बरे होऊन त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.>अमेरिकेत सुरू असलेल्या प्रयोगातील निष्कर्षात म्हटले आहे की, कोरोनाची संसर्गाची लक्षणे दिसू लागल्यानंतर दहा दिवसांच्या आत जर रेमडेसिव्हिर हे औषध दिले तर त्याचा परिणाम त्यानंतरच्या दहा दिवसांत दिलेल्या औषधाच्या परिणामांपेक्षा अधिक उत्तम असतो. ज्यांना रेमडेसिव्हिर हे औषध पाच दिवसांसाठी दिले, त्यांच्यापैकी ५० टक्के रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. तशीच सुधारणा ज्यांना १० दिवस हे औषध दिले त्यांच्यातही दिसून आली. या दोन्ही गटांतील रुग्णांपैकी निम्मे रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या