शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
3
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
4
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
5
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
6
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
7
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
8
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
9
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
10
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
11
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
12
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
13
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
14
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
15
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
16
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
17
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
18
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
19
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?
20
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट

CoronaVirus News: जागतिक लसीकरणासाठी अपेक्षेच्या फक्त १०% निधी जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 03:57 IST

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेली माहिती; निधी संकलनाच्या दृष्टीने मोठे अपयश पदरी येण्याची चिन्हे

जिनिव्हा : जगातील विविध देशांनी एकत्रितपणे कोरोना महामारीविरुद्धची लस विकसित करून ती जगातील सर्व देशांमध्ये सर्वांना समन्यायी पद्धतीने उपलब्ध करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) हाती घेतलेल्या कार्यक्रमास निधी संकलनाच्या दृष्टीने मोठे अपयश पदरी येण्याची चिन्हे आहेत.जगातील सर्वांना कोरोनाच्या चाचण्या, त्यावरील उपचार व लस जलदगतीने उपलब्ध व्हावी यासाठी ‘डब्ल्यूएचओ’ने गेल्या एप्रिलमध्ये ‘अ‍ॅसेस टू कोविड-१९ टूल्स’ (एसीटी) हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला होता. यातील लस विकसित करण्याचा हिस्सा ‘कोवॅक्स’ या नावाने ओळखला जातो. खासकरून लस विकसित करणे, ती तयार झाल्यावर तिचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणे व तिचे सर्वांना समन्यायी पद्धतीने वितरण करणे, हा त्यामागचा प्रमुख हेतू होता. त्यासाठी सदस्य देशांनी स्वेच्छेने निधी द्यावा, अशी अपेक्षा होती.‘डब्ल्यूएचओ’चे महासंचालक डॉ. तेद्रॉस घेब्रियेसस यांनी व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत सांगितले की, निदान निधी उभारण्याच्या बाबतीत तरी या कार्यक्रमास समाधानकारक यश आल्याचे दिसत नाही. १०० अब्ज डॉलर सर्व देशांकडून मिळून जमा होतील, अशी अपेक्षा होती; पण त्यापैकी आतापर्यंत जेमतेम १० टक्के रक्कम जमा झाली आहे.ते म्हणाले की, १०० अब्ज डॉलर ही रक्कम नक्कीच मोठी आहे; परंतु या महामारीमुळे विस्कळित झालेल्या अर्थव्यवस्था सावरण्यासाठी जगातील सर्वात श्रीमंत २० देशांनी (जी-२० गटातील देश) याच्या दसपट रक्कम खर्च केली हे लक्षात घेता १०० अब्ज डॉलर उभे राहणे अशक्य मात्र नाही. (वृत्तसंस्था)उत्पादन हेच मोठे आव्हानलस विकसित झाली तरी जगभर पुरविता येईल एवढ्या मोठ्या प्रमाणावर तिचे उत्पादन करणे व कोरोना महामारीला परिणाकारक व त्वरेने आळा बसेल अशा पद्धतीने तिचे जगाच्या विविध भागांत वितरण करून प्रत्यक्ष व्यापक लसीकरण करणे हे ‘डब्ल्यूएचओ’पुढील दुसरे मोठे आव्हान आहे.जगभरात कोरोना लस विकसित करण्याचे शेकडो प्रयोग सुरू आहेत. त्यातील सुमारे ३० संभाव्य लसी प्रत्यक्ष माणसांवर चाचण्या करून पाहण्याच्या विविध टप्प्यांपर्यंत पोहोचल्या आहेत. येत्या डिसेंबरपर्यंत नाही तरी निदान पुढील वर्षाच्या सुरुवातीस तरी लस प्रत्यक्ष वापरासाठी उपलब्ध होऊ शकेल, असे मानले जात आहे.2021 च्या अखेरपर्यंत ‘कोवॅक्स’ कार्यक्रमाच्या अंतर्गत लसीच्या किमान दोन अब्ज डोसचे उत्पादन करून त्याचे वितरण प्रामुख्याने मध्यम व निम्न उत्पन्न गटातील देशांना करण्याचा संघटनेचा विचार आहे.स्वतंत्रपणे लस विकसित करून तिचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याची बहुतांश देशांची ऐपत नाही. त्यामुळे जागतिक पातळीवरील सामूहिक प्रयत्नांतून हे काम करायचे, अशी ही योजना आहे.जे देश यासाठी निधी देतील त्यांना या प्रयत्नांतून विकसित होणारी लस अग्रक्रमाने उपलब्ध करून दिली जाईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या