शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
4
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
5
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
6
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
7
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
8
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
9
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
10
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
11
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
12
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
13
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
14
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
15
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
16
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
17
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
18
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
19
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
20
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...

CoronaVirus News : अमेरिकेत एकाच दिवसात आढळले ६६ हजारांहून अधिक नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 07:33 IST

जगात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांमध्ये अमेरिका प्रथम स्थानी, ब्राझिल दुसऱ्या व भारत तिसºया क्रमांकावर आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये एकाच दिवसात ६६ हजारांहून अधिक इतक्या विक्रमी संख्येने कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे येथील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ३२ लाखांवर गेली आहे. अमेरिकेत कोरोनाने माजविलेला हाहाकार लवकर थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत.जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेतील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ३२,४२,०७३ इतकी झाली आहे. कोरोनाच्या संसगार्मुळे त्या देशात शनिवारी आणखी ७६० जणांचे बळी गेले. त्यामध्ये मृतांचा एकूण आकडा १,३४, ७२९ झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून अमेरिकेत दररोज कोरोनाचे ६० हजारहून अधिक नवे रुग्ण सापडत आहेत. जगात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांमध्ये अमेरिका प्रथम स्थानी, ब्राझिल दुसऱ्या व भारत तिसºया क्रमांकावर आहे.दुसºया बाजूला काही चांगल्या गोष्टीही घडत आहेत. डिस्ने वर्ल्डने आपल्या चार ओरलँडो थीम पार्कपैकी दोन पार्क शनिवारपासून जनतेसाठी खुली केली. त्या पार्कमध्ये जाण्यासाठी नागरिकांनी तिकीटांचे आगाऊ आॅनलाइन आरक्षण केले होते. पर्यटकांच्या शरीराचे तापमान तपासून व हँड सॅनिटायझर लावल्यानंतरच त्यांना या पार्कमध्ये प्रवेश देण्यात येत होता.अमेरिकेतील कोरोना साथीचा मोठा फैलाव लक्षात घेऊन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सार्वजनिक ठिकाणी पहिल्यांदाच शनिवारी मास्क परिधान केला होता. ते वॉल्टर रिड लष्करी रुग्णालयात काही रुग्णांच्या ्प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेले होते. ट्रम्प यांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क परिधान करावा अशी सहकाऱ्यांनी केलेली विनंती अखेर त्यांनी मान्य केली.ब्राझिलमध्ये आणखी ३९ हजार रुग्णब्राझिलमध्ये गेल्या चोवीस तासात कोरोनाचे ३९,००० नवे रुग्ण आढळून आले. याच कालावधीत त्या देशात आणखी एक हजारपेक्षा जास्त जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ब्राझिलमधील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १,८३९,८५० इतकी झाली असून आतापर्यंत ७१,४६९ जणांचा बळी गेला आहे. या देशात आतापर्यंत १० लाखांहून अधिक लोक कोरोनाच्या आजारातून बरे झाले आहेत. तिथे शुक्रवारी कोरोनाचे ४५ हजार नवे रुग्ण आढळून आले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका