शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : लस शोधण्याच्या प्रक्रियेतील पहिला टप्पा यशस्वी, मॉडर्ना कंपनीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 05:32 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : या अमेरिकन कंपनीच्या दाव्यानंतर लशीच्या प्रतीक्षेत असलेल्या संपूर्ण जगाला दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

वॉशिंग्टन : संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेतलेल्या कोविड-१९ या महामारीवर उपाय म्हणून लस शोधण्याच्या प्रक्रियेतील पहिला टप्पा यशस्वी झाल्याचा दावा अमेरिकेतील एका कंपनीने सोमवारी केला. या अमेरिकन कंपनीच्या दाव्यानंतर लशीच्या प्रतीक्षेत असलेल्या संपूर्ण जगाला दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ हेल्थ अर्थात ‘एनआयएच’च्या नियंत्रणाखाली हे परीक्षण पार पडले. लशीच्या मनुष्यावरील पहिल्या परीक्षणाचे निष्कर्ष मॉडर्ना कंपनीने सोमवारी प्रथमच जाहीर केले. यातील सहभागी ४५ स्वयंसेवकांना लस टोचल्यानंतर त्यांच्यात कोरोना विषाणूच्या संसर्गापासून रक्षण करणारी प्रतिकारक्षमता तयार झाली. अशा प्रकारचे आणखी काही परीक्षण तातडीने करण्यात येणार आहेत. जेणेकरून आत्यंतिक गरज भासल्यास या लशीचा वापर करता येईल, असे कंपनीतर्फे नमूद करण्यात आले आहे.या लशीच्या उंदरांवरील परीक्षणासाठी ‘एनआयएच’चे मोलाचे सहकार्य लाभल्याचा उल्लेख कंपनीने आवर्जून केला. उंदरांना ही लस टोचल्यानंतर त्यांच्या फुफ्फुसांनी संसर्ग रोखण्याच्या प्रक्रियेला सकारात्मक प्रतिसाद दिला. लस तयार करण्याच्या प्रक्रियेतील पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्याची तयारी सुरू करण्यात येणार आहे. जुलैमध्ये परीक्षणाचा तिसरा टप्पा घेण्यात येईल. २५ मायक्रोग्रॅम या सर्वांत कमी मात्रेचे डोस घेणाºया १५ स्वयंसेवकांच्या रक्तातील अ‍ॅन्टीबॉडी आणि कोविड-१९च्या संसर्गातून बºया झालेल्या रुग्णाच्या रक्तातील अ‍ॅन्टीबॉडी यांचे प्रमाण सारखे आहे.असे झाले परीक्षण- या परीक्षणात १८ ते ५५ वर्षे वयोगटातील ४५ स्वयंसेवकांचा समावेश होता. पहिल्या टप्प्याचे हे परीक्षण करताना स्वयंसेवकांच्या आरोग्याची सुरक्षा हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवण्यात आला होता. याला बºयापैकी यश लाभल्याचे कंपनीने म्हटले आहे. स्वयंसेवकांना २५, १०० आणि २५० मायक्रोग्रॅमच्या ३ मात्रांपैकी कोणत्याही एका मात्रेचे २ डोस देण्यात आले. यामुळे सर्वांच्या शरीरात अ‍ॅन्टीबॉडी तयार झाल्या. तिन्ही मात्रांचे डोस घेणाºया स्वयंसेवकांच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती विकसित झाल्याचे दिसून आले, असा दावा मॉडर्ना कंपनीने केला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका