शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : कोणत्या प्राण्यातून ‘कोरोना’चा उगम झाला, याचा शोध घ्यावा;‘डब्ल्यूएचओ’मध्ये भारतासह ६२ देशांचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 06:14 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : ‘वर्ल्ड हेल्थ अ‍ॅसेंब्ली’ ही ‘डब्ल्यूएचओ’ची धोरणात्मक निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था आहे. भारतासह ३५ देश व २७ सदस्यांचा युरोपीय संघ यांनी मिळून हा नऊ पानी प्रस्ताव मांडला असून, अ‍ॅसेंब्लीमध्ये त्यावर (भारतीय प्रमाणवेळेनुसार) सोमवारी रात्री चर्चा होऊन निर्णय घेतला जाणे अपेक्षित होते.

जिनिव्हा : सध्या संपूर्ण जगात हाहाकार माजविणाऱ्या कोरोना विषाणूचा उगम नेमका कोणत्या प्राण्यातून झाला, याचा शोध घेतला जावा आणि या विषाणूमुळे पसरलेल्या ‘कोविड-१९’ महामारीच्या संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) प्रतिसादाचे निष्पक्ष व सर्वंकष मूल्यमापन केले जावे, असा प्रस्ताव भारतासह ६२ देशांनी ‘वर्ल्ड हेल्थ अ‍ॅसेंब्ली’मध्ये मांडला आहे.‘वर्ल्ड हेल्थ अ‍ॅसेंब्ली’ ही ‘डब्ल्यूएचओ’ची धोरणात्मक निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था आहे. भारतासह ३५ देश व २७ सदस्यांचा युरोपीय संघ यांनी मिळून हा नऊ पानी प्रस्ताव मांडला असून, अ‍ॅसेंब्लीमध्ये त्यावर (भारतीय प्रमाणवेळेनुसार) सोमवारी रात्रीचर्चा होऊन निर्णय घेतला जाणे अपेक्षित होते.या विषाणूच्या उगमावरून अमेरिका व चीन यांच्यात मध्यंतरी जोरदार जुंपली होती व ‘डब्ल्यूएचओ’ चीनला पाठीशी घालत असल्याचा आरोप करून, अमेरिकेने या जागतिक संस्थेला निधी देणेही बंद केले होते. आता हा प्रस्ताव मांडणाºया देशांमध्ये अमेरिका व चीन या दोन्ही देशांचा समावेश नाही. भारताने या ठरावासाठी पुढाकार घ्यावा, हे लक्षणीय आहे. कारण, भारताने आत्तापर्यंत या वादापासून अलिप्त राहणे पसंत केले होते व परस्परांवर आरोप करण्यापेक्षा आलेल्या संकटास एकदिलाने सामोरे जाणे अधिक महत्त्वाचे आहे अशी भूमिका घेतली होती. या महामारीची सुरुवात गेल्या डिसेंबरमध्ये चीनच्या वुहान प्रांतात झाली होती, हे स्वत: चीननेही नाकारलेले नाही; मात्र साथ तेथे सुरू झाली म्हणून विषाणूचा उगमही तेथूनच झाला, असे मानणे चुकीचे आहे असे चीनचे म्हणणे आहे. हा विषाणू एखाद्या प्राण्यातून माणसात संक्रमित झाला असावा असे मानले जाते. चीनमध्ये चित्र-विचित्र प्राणी मानवी अन्न म्हणून खाल्ले जातात व अशा प्राण्यांच्या अनियंत्रित बाजारांतून कदाचित हा विषाणू पसरला असावा असेही काहींना वाटते. (वृत्तसंस्था)सध्या चौैकशी नको : चीनजगभर कोरोनामुळे गंभीर परिस्थिती असल्याने आता जे संकट आपल्यासमोर आहे, त्या कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात कमी झाल्यावर याबाबत सविस्तर माहिती देण्यास आम्ही तयार आहोत. मात्र, सध्या याबाबत चौकशीची चर्चा नको, असे चीनने म्हटले आहे. तसेच सध्या कोरोनावर नियंत्रण मिळविण्याला आमचे प्राधान्य असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना