शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडणार : डोनाल्ड ट्रम्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 00:35 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : अमेरिकेमधे कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत असून, बाधितांची संख्या १५ लाखांवर गेली आहे. चीनने कोरोनाच्या प्रसाराची माहिती लपवल्याचा आरोप ट्रम्प वारंवार करीत आहेत.

वॉशिंग्टन : जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) अमेरिकेने केलेल्या मागण्यांबाबत येत्या तीस दिवसांत योग्य ती पावले न उचलल्यास अमेरिका आरोग्य संघटनेच्या सदस्यत्वाचा त्याग करेल. त्याचबरोबर जागतिक आरोग्य संघटनेला दिला जाणारा निधी कायमस्वरूपी बंद करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. जागतिक आरोग्य संघटना चीनच्या हातातील बाहुले झाले असल्याची खरमरीत टीका देखील त्यांनी केली.अमेरिकेमधे कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत असून, बाधितांची संख्या १५ लाखांवर गेली आहे. चीनने कोरोनाच्या प्रसाराची माहिती लपवल्याचा आरोप ट्रम्प वारंवार करीत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचा निधी थांबविण्याची घोषणा त्यांनी या पुर्वीच केली आहे. अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेच्या मोठ्या दात्यांपैकी एक आहे. अमेरिकेने २०१८-१९ मधे जागतिक आरोग्य संघटनेला तब्बल ४०० दशलक्ष डॉलरचा निधी दिली होता. ही रक्कम जागतिक आरोग्य संघटनेच्या एकूण निधी पैकी तब्बल १५ टक्के इतकी आहे.ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रॉस घेब्रेयेसुस यांना पत्र पाठवित जागतिक आरोग्य संघटना कोरोनाबाबत राबवित असलेल्या उपाययोजनांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. आरोग्य संघटनेने सातत्याने चुकीची पावले उचलल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेची पुर्नरचना करण्याची मागणी केली असून, त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याची सूचनाही केली आहे. आरोग्य संघटना रोगाचा प्रसाराची धोक्याची घंटा बजावण्यात अपयशी ठरले. तसेच, त्यांनी चीनने दिलेल्या खोट्या आकडेवारीवर विश्वास ठेवला. जागतिक आरोग्यसंघटनेने चीनने दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवत मानवी प्रसार न झाल्यावर विश्वास ठेवला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प