शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोनाची साथ नजीकच्या काळात संपण्याची शक्यता नाही; जागतिक आरोग्य संघटनेेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 06:44 IST

कोरोनाची साथ नजीकच्या काळात संपण्याची शक्यता नाही, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधनोम घेब्रिसस यांनी दिला.

जिनेव्हा : कोरोनाची साथ नजीकच्या काळात संपण्याची शक्यता नाही, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधनोम घेब्रिसस यांनी दिला. काही देशांमध्ये अगदी कमी प्रमाणात लसीकरण झाले आहे. त्याबाबत त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली.ते म्हणाले की, ओमायक्रॉन हा कमी घातक आहे, असा अनेक जणांचा गैरसमज झाला आहे. या नव्या विषाणूचा संसर्ग जगभरात झपाट्याने पसरला. ओमायक्रॉनमुळे सौम्य स्वरूपाचा संसर्ग होतो, या म्हणण्यात फारसे तथ्य नाही. ओमायक्रॉनमुळे बाधितांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. या विषाणूच्या संसर्गाने मृत्यूही होत आहेत.  घेब्रिसस म्हणाले की, काही देशांमध्ये ओमायक्रॉन बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. पण त्यामुळे घाबरून न जाता साथीवर मात करण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. निरोगी मुलांना बूस्टर डोसची गरज नाहीजागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले की, निरोगी मुलांना बूस्टर डोस देण्याची आवश्यकता असल्याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. कोरोना विषाणूच्या प्रत्येक प्रकारासाठी नवी लस तयार करण्याची आवश्यकता नाही. अमेरिका, जर्मनी, इस्रायलने मुलांना बूस्टर डोस देण्यास सुरुवात केली. भारताने १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू केले. त्या पार्श्वभूमीवरील प्रश्नाला सौम्या स्वामीनाथन यांनी उत्तर दिले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना