शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

चिनी ड्रॅगनला घायाळ करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची खेळी; अमेरिकेकडून मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 09:50 IST

चीनला आर्थिक फटका देण्यासाठी अमेरिकेचा मोठा निर्णय

वॉशिंग्टन: चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोनानं आतापर्यंत अडीच लाख लोकांचा जीव घेतला आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. कोरोना संकटासाठी चीनला जबाबदार धरत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा चीनवर आरोप केले आहेत. यानंतर आता ट्रम्प यांनी अधिक आक्रमक पवित्रा घेत चिनी वस्तूंवर अधिक कर लावण्याचा निर्णय घेतला आहे.चीनला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्यासाठी अमेरिकन प्रशासनानं चिनी वस्तूंवर अतिरिक्त  कर आकारण्याचा निर्णय जाहीर केला आहे. अमेरिकेत याच वर्षी निवडणूक होत आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी परदेशांमधले उत्पादन निर्मिती करणारे कारखाने मायदेशी आणण्याचं आश्वासन ट्रम्प यांनी दिलं आहे. त्याचाच भाग म्हणून आता चिनी वस्तूंवरील कर वाढवण्यात आला आहे. यामुळे चीनमधून येणाऱ्या वस्तूंची किंमत वाढून त्या उत्पादनांना असणारी मागणी घटण्याची दाट शक्यता आहे.कोरोना विषाणू नैसर्गिकरित्या पसरला की चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेत त्याची निर्मिती करण्यात आली, याबद्दलचे सबळ पुरावे अद्याप सापडले नसल्याचं अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनं काही दिवसांपूर्वीच म्हटलं होतं. मात्र अमेरिकन सरकारनं वैज्ञानिकांचा दावा बाजूला ठेवून चीनला लक्ष्य केलं आहे. कोरोना विषाणूची निर्मिती वुहानमधल्या एका प्रयोगशाळेत झाल्याचे पुरावे सरकारकडे असल्याचं परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पियो यांनी म्हटलं आहे. कोरोना विषाणू डिसेंबरमध्ये वुहानमध्ये पसरला. कोरोनाचं संकट मानवनिर्मित आहे. अनेक तज्ज्ञांनीदेखील यावर भाष्य केलं असल्याचंही माईक पॉम्पियो पुढे म्हणाले. 'याबद्दल अविश्वास व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे कोणतंही कारण नाही. विषाणूंच्या माध्यमातून संसर्ग पसरवण्याचा चीनचा इतिहास आहे. स्वच्छता आणि सुरक्षा प्रक्रियांचा विचार केल्यास चीनमधल्या प्रयोगशाळांचा दर्जा अतिशय वाईट आहे,' असं परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटलं."त्यांच्या कुटुंबावरही कोणी तरी फुले उधळा, त्यांच्यासाठीही बँड वाजवा, पणत्या-मेणबत्त्या पेटवा"ड्युटीवर असुरक्षित वाटत असल्यानं IAS अधिकाऱ्याचा राजीनामा; मोदींनाही ई-मेल करणारदिलासादायक! गेल्या २४ तासांत १०७४ जण कोरोनामुक्त; बऱ्या होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण २८ टक्क्यांवर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पchinaचीन