शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: ब्रिटनमध्ये प्लाझ्मा थेरपी घेतलेल्या रुग्णांमध्ये सापडला नवा विषाणू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 23:48 IST

CoronaVirus News: प्लाझ्मा थेरपी व विषाणूचे उत्परिवर्तन होऊन नवा विषाणू तयार होणे या गोष्टींचा एकमेकांशी काही संबंध आहे. कोरोना झालेल्या रुग्णांवर सुमारे १०१ दिवसांत रेमडेसिवीर, अँटिबायोटिक्स, स्टिरॉइड्स व प्लाझ्मा थेरपीच्या साहाय्याने व्यवस्थित उपचार करण्यात आले होते.

नवी दिल्ली : प्लाझ्मा थेरपीचे उपचार घेतलेल्या कोरोना रुग्णांमध्ये त्यानंतर या विषाणूचे उत्परिवर्तन होऊन नवा कोरोना विषाणू तयार झाला. अशाच प्रक्रियेमुळे ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू असलेला पहिला रुग्ण आढळला.यासंदर्भात नेचर या नियतकालिकात एक संशोधनपर लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, प्लाझ्मा थेरपी व विषाणूचे उत्परिवर्तन होऊन नवा विषाणू तयार होणे या गोष्टींचा एकमेकांशी काही संबंध आहे. कोरोना झालेल्या रुग्णांवर सुमारे १०१ दिवसांत रेमडेसिवीर, अँटिबायोटिक्स, स्टिरॉइड्स व प्लाझ्मा थेरपीच्या साहाय्याने व्यवस्थित उपचार करण्यात आले होते. केंब्रिज विद्यापीठातील संशोधक रवींद्र गुप्ता यांनी सांगितले की, उपचार सुरू असलेल्या कोरोना रुग्णांच्या शरीरातून आम्ही २३ वेळा कोरोना विषाणूचे नमुने गोळा केले. कोरोना विषाणूमध्ये पहिले उत्परिवर्तन झाल्याची घटना चीनमध्ये घडली. ब्रिटनमध्ये कोरोना रुग्णांमधील विषाणूचे उत्परिवर्तन होत असल्याच्या प्रक्रियेचा मागोवा शास्त्रज्ञांनी घेतला. या देशात आढळलेला नव्या प्रकारचा कोरोना विषाणू हा मूळ विषाणूपेक्षा अधिक संसर्गशक्ती असलेला व घातक आहे. ब्रिटनच्या नव्या कोरोना विषाणूने बाधित झालेले रुग्ण अनेक देशांमध्ये आढळून आले आहेत. त्यामुळे ब्रिटनहून येणाऱ्या प्रवाशांना काही देशांनी तात्पुरती प्रवेशबंदी केली आहे.को-विन ॲप नोंदणी; आधारची गरज नाहीकोरोनावरील लसीकरणासाठी विकसित करण्यात आलेल्या कोविनॲपवर नोंदणीसाठी आधार क्रमांकाची आवश्यकता नसल्याचे लोकसभेत केंद्र सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौबे यांनी ही माहिती दिली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या