शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: नवीन उपचार पद्धतीमुळे होणार फिजिकल डिस्टन्सिंगपासून सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 06:50 IST

अमेरिकी शास्त्रज्ञांचा दावा; पुढील वर्षी अंमलबजावणी होण्याची शक्यता

वॉशिंग्टन : कोरोना संसर्गावर प्रतिबंधक लस शोधून काढण्यासाठी जगभरात प्रयोग सुरू असतानाच, या आजारावर नवी उपचार पद्धती शोधण्यासाठी अमेरिकी शास्त्रज्ञ विविध प्रयोग करीत आहेत. ते यशस्वी झाल्यास पुढील वर्षीच्या प्रारंभापासून ही नवी उपचार पद्धती लागू करण्यात येईल. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झालेल्यांना किंवा न झालेल्यांना फिजिकल डिस्टन्सिंग राखण्याची गरज उरणार नाही. ते मनात कोणतीही भीती न बाळगता सर्वत्र संचार करू शकतील.कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीची प्रकृती गंभीर होऊ नये, तसेच त्याचा जीव वाचविण्यावर या उपचार पद्धतीत कटाक्ष ठेवण्यात आला आहे. कोरोनाची साथ जगात पसरून सात महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. या संसर्गामुळे जगभरात लाखो लोक बळी पडले आहेत. सर्वात मोठी हानी अमेरिकेमध्ये झाली आहे. जगामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण अमेरिका, ब्राझील व भारतामध्ये आहेत. या आजारावर प्रतिबंधक लस तयार केल्याचा दावा रशियाने केला आहे. मात्र, त्या लसीच्या गुणवत्तेविषयी इतर देशांतील शास्त्रज्ञांनी शंका व्यक्त केली आहे.कोरोनावरील नव्या उपचार पद्धतीमध्ये सार्स ब्लॉक थेरपीचाही समावेश होतो. सिथेंटिक प्रोटिन सिक्वेन्सवर आधारित नवी उपचार पद्धती विकसित करण्यासाठी अमेरिका व ब्रिटनमधील काही कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर पैशाची गुंतवणूक केली आहे. शरीरातील पेशींमध्ये कोरोना विषाणूचा शिरकाव होण्यापासून या नव्या उपचार पद्धतीद्वारे प्रतिबंध केला जाईल. ही उपचार पद्धती त्या विषाणूची ओळखही पटवील व त्याच्याशी लढा देण्यासाठी शरीरात आवश्यक तितकी रोगप्रतिकारशक्ती निर्माण करील.अद्याप रामबाण औषध उपलब्ध नाहीकोरोना संसर्गावर सध्या एकही रामबाण औषध वा लस उपलब्ध नाही. हा आजार झालेल्या रुग्णांना सध्या देण्यात येणाऱ्या काही औषधांचा गुण येत असला तरी जगभरात आणखी परिणामकारक औषध शोधण्यासाठी प्रयोग सुरूच आहेत.कोरोनाला आळा घालण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा उपयोग केला जात आहे.मात्र, त्यापेक्षा अधिक सुलभ उपचार पद्धती शोधण्याकडे अमेरिकेसह काही प्रगत देशांतील शास्त्रज्ञांचा कल आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या