शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: जगातील बाधितांची संख्या एक कोटीच्या पुढे; 'या' ३८ देशांची कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 07:07 IST

मृत्यूचा विचार केला तर सर्वाधिक १.२९ लाख मृत्यू मार्च महिन्यात झाल्याचे दिसते. त्यानंतरच्या महिन्यांत संसर्गाचे प्रमाण वाढत गेले तरी मृत्यूचे प्रमाण मात्र कमी होत गेल्याचे ही आकडेवारी सांगते.

नवी दिल्ली : जगभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येने शनिवारी रात्री एक कोटीचा टप्पा पार केला. ‘वल्डोमीटर’ने केलेल्या मोजणीनुसार हा आकडा आता एक कोटी ४५ एवढा झाला आहे. गेल्या डिसेंबरमध्ये चीनच्या वुहान प्रांतात या महामारीचा सर्वप्रथम उगम झाल्यापासून अवघ्या सहा महिन्यांत या विषाणूचा एवढा प्रचंड प्रसार झाला आहे.

उन्हाळा सुरु झाला की साथीचा जोर कमी होईल हा जाणकारांनी व्यक्त केलेला अंदाजही खोटा ठरला. एक कोटी बाधितांपैकी सुमारे ७५ टक्के रुग्णांना मे आणि जून या गेल्या दोन महिन्यांत संसर्ग झाला. जूनमध्ये जगभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज सरासरी १.२५ लाखांनी वाढ झाली आहे. बहुतेक सर्वच देशांनी एक ते तीन महिन्यांचे ‘लॉकडाऊन’ लागू केले. त्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्था पार डळमळल्या. त्या सावरण्यासाठी निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केल्यावर विषाणूने पुन्हा जोमाने डोके वर काढल्याचे आकडेवारीवरून दिसते.

मृत्यूचा विचार केला तर सर्वाधिक १.२९ लाख मृत्यू मार्च महिन्यात झाल्याचे दिसते. त्यानंतरच्या महिन्यांत संसर्गाचे प्रमाण वाढत गेले तरी मृत्यूचे प्रमाण मात्र कमी होत गेल्याचे ही आकडेवारी सांगते.३८ देशांनी केली कोरोनावर माततुवालू, वानुआतू वसॉलोमन आयलँड््स यासारख्या छोट्या बेटांसह एकूण ३८ देशांनी अनेक महिन्यांच्या लढ्यानंतर या साथीवर पूर्ण मात केली आहे किंवा मात करण्याच्या ते बेतात आहेत. चीननेही कोरोनामुक्ती जाहीर केली होती. परंतु थोड्या खंडानंतर तेथे पुन्हा रुग्ण आढळणे सुरु झाले होते. न्यूझीलंडनेही कोरोनावर मात केल्याचे जाहीर केले. पण तेथेही नंतर काही नवे रुग्ण आढळले होते. श्रीलंकेने आता तेथे एकही नवा रुग्ण नसल्याचे म्हटले आहे तर भूतानमधील रुग्णसंख्या फक्त सातवर आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या