शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
4
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! ब्रोकरेज फर्मकडून 'या' ५ शेअर्सना खरेदीचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
5
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
6
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
7
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
8
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
9
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
10
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
11
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
12
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
13
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
14
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
15
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
16
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
17
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
18
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
19
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा

coronavirus : मिस इंग्लंड आणि आर्यलंडचे पंतप्रधान दोघांनी ठरवलं, आपण पुन्हा ‘डॉक्टर’ व्हायचं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 16:41 IST

डॉक्टर म्हणून ऑन फिल्ड सज्ज झालेल्या या दोघांची ही गोष्ट, डॉक्टरांचा  सन्मान वाढवणारी!

ठळक मुद्देडॉ. भाषा आणि डॉ. लिओ

डॉक्टर होताना एक शपथ घ्यावी लागते रुग्ण सेवेची.आणि आज तर काळ असा आहे की, जगभरातच डॉक्टर सुपरहिरो बनून स्वत:च्या जीवाची पर्वा न करता, कोरोनाचा सामना करायला उभे ठाकलेत.त्यातलेच हे दोघे. योगायोगाने दोघांची मूळं भारतीय मातीत रुजलेली आहेत.मात्र आपापल्या देशात ‘कर्तव्य आधी’ असं म्हणत त्यांनी आपला डॉक्टरकीचा पांढरा कोट पुन्हा अंगावर चढवला आहे.त्यातलंच पहिलं नाव म्हणजे मिस इंग्लंड-2010 भाषा मुखर्जी. वय वर्षे 24. ती जन्माने भारतीय आहे. ती 9 वर्षाची असताना तिचे पालकइंग्लंडला रहायला गेले. ती तिथंच शिकली, वाढली. डॉक्टर झाली.मॉडेलिंगही ती करत होती. 2019 मध्ये मिस इंग्लंडचा मुकूट तिच्या डोक्यावर विराजमान झाला आणि तिनं मिस वल्र्ड स्पर्धेसाठी इंग्लंडचं नेतृत्वही केलं.ती स्पर्धा झाल्यांनर ऑगस्ट 2020 र्पयत तिनं कामातून ब्रेक घेतला. ज्युनिअर डॉक्टर म्हणून ती त्यापूर्वी काम करत होती. मात्र मिस वल्र्ड स्पर्धेनंतर भारत -पाकिस्तानसह आफ्रिका, तुर्कस्थान या देशात तिला भेटीगाठी द्यायच्या होत्या. धर्मदाय कामांसाठी दूत म्हणून हजेरी लावायची होती.त्यासाठी मार्चमधल्या पहिल्या आठवडय़ात ती भारतातही आली होती. मात्र कोरोनाच कहर वाढला आणि ती पुन्हा लंडनला परतली. दरम्यान तिचे सहकारी, मित्र डॉक्टर्स तिला मेसेज करतच होते की, परिस्थिती कठीण आहे. अमूक घडतंय, तमूक होतंय. तू काय ठरवलंस?ती सांगते, ते सारं वाचून मला असं वाटलं की मी डॉक्टर आहे. माझी गरज आहे  देशाला, जिथं मी शिकले, वाढले, त्या समाजात आता मी काम करायला हवं. म्हणून मग मी पुन्हा कामावर रुजू व्हायचं ठरवलं. पूर्व लंडनमधल्या पिलग्रिम हॉस्पिटलमध्ये पुन्हा सेवेत रुजू होण्याचा तिनं निर्णय घेतला. त्यांना कळवलाही. मात्र परदेश प्रवास करुन आल्यानं तिला दोन आठवडे आयसोलेशनमध्ये राहावं लागलं.त्यानंतर आता तिनं कामाला सुरुवात केली आहे.

डॉ. भाषा सांगते,‘समाजाला डॉक्टरांची गरज असताना मी डोक्यावर ब्युटी क्राऊन घालून मिरवू का? एरव्ही आम्ही जगभर जातो,धर्मदाय कामांना मदत व्हावी म्हणून सहभाग घेतो त्यावेळी सुंदर दिसणं, ब्युटी क्राऊन डोक्यावरच असणं हे सक्तीचं असतं. मात्र आता देशात परिस्थिती अशी आहे की, तो क्राऊन डोक्यावरुन उतरवून मी कामाला लागलं पाहिजे. जगभर लोक आपली लढाई लढत आहेत. माङया व्यवसायातले लोक तर जीवाची बाजी लावत आहेत, मला त्यांच्याबरोबर उभं राहून काम करायचं आहे. आता वेळ सुंदर दिसत डोक्यावर क्राऊन मिरवायची नाही तर झडझडून काम करण्याची गरज आहे, मी तेच करणार आहे!’त्यासाठीच ती आता कामाला लागली आहे.

  कर्तव्यतत्परतेचं असंच एक नाव म्हणजे आर्यलण्डचे पंतप्रधान डॉ. लिओ वराडकर. त्यांची मूळं महाराष्ट्रातल्या कोकणातली. व्यवसायानं ते डॉक्टर. राजकारणात येण्यापूर्वी ते 7 वर्षे प्रॅक्टीसही करत होते. 2013 पासून मात्र त्यांनी काम बंद केलं होतं.मात्र आता कोरोनाशी दोन हात करताना केवळ पंतप्रधान म्हणून नाही तर रुग्णसेवासाठी डॉक्टर म्हणूनही आपण आठवडडय़ातले काही तास उपलब्ध असू असं त्यांनी जाहीर केलं आहे. देशातल्या हेल्थ सव्र्हिस एक्ङिाक्युटिव्ह या संस्थेकडे त्यांनी स्वत:ची पुन्हा नोंदणी केली आहे. आणि माङया शिक्षणाला, अनुभवाला अनुरुप काम द्या अशी त्यांना विनंतीही केली.सध्या ते फोनवर रुग्ण तपासणी आणि मार्गदर्शनाचं काम करत आहेत. डॉक्टर म्हणून ऑन फिल्ड सज्ज झालेल्या या दोघांची ही गोष्ट, डॉक्टरांचा  सन्मान वाढवणारी!