शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

कोरोनाचा सगळ्यात मोठा फटका मिलेनिअल्सना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 16:25 IST

मिलेनिअल जनरेशन बेफिकीर, पैसा सांभाळून पण जीव धोक्यात!

ठळक मुद्देजनरेशन कोरोना

कोरोनाच्या निमित्तानं एक नवीन शब्द सध्या चर्चेत येतो आहे. त्याचं नाव जनरेशन कोरोना. म्हणजे काय तर मिलेनिअल्सची अर्थात 1981 ते 1996 या दरम्यान जन्माला आलेल्या तरुण वर्गाची ही अशी पिढी, जी जगून घ्या हेच तत्वज्ञान जगभर जगते.त्यांच्या खर्च करण्याच्या सवयी, खाण्यापिण्याच्या, चटचट नोक:या बदलून, पटपट नवीन सारं शिकण्याच्या, इमोशनल घोळ न घालण्याच्या सवयी हे सारं या मिलेनिअल्स पिढीचं वैशिटय़ मानलं जातं. मात्र वित्तविषयक वार्ताकन करणा:या एक  वृत्तवाहिनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार कोरोनाचा सगळ्यात मोठा फटका या मिलेनिअल्सना बसला आहे.सगळ्यात जास्त त्यांच्या सवयी बदलल्या आहे. सगळ्यात जास्त कुणाचं आयुष्य बदललं असेल तर ते त्यांचं बदललं आहे. आणि ते ही जगभर.सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या मुलांची जीवनशैली अत्यंत खर्चिक मानली जाते. जे हवं ते लगेच खरेदी करण्याकडे त्यांचा कल असतो. मात्र सगळ्यात मोठा बदल हा होताना दिसतो आहे की, ही मिलेनिअल्स पिढी विचार करुन खरेदी करते आहे. त्यांच्या विकत घेण्याच्या सवयीनाच या कोरोनाने मोठा तडाखा दिला आहे.

 

एकीकडे व्यक्तिगत आयुष्यात हे चांगलं असलं तरी या मिलेनिअल्सना डोळ्यासमोर ठेवून जी बाजारपेठ फिरत होती, तेजीत होती तिच्यावर थेट परिणाम या खरेदी करण्याच्या बदलत्या सवयींचा होणार आहे.ज्याला पर्चेस डिसिजन म्हणतात अर्थात खरेदीनिर्णयक्षमता तिचे सारे ठोकताळेच या कोरोनाच्या संकटाने बदलून टाकले आहेत. मुख्य म्हणजे या पिढीने इतकी आर्थिक असुरक्षितता जगभरात पहिल्यांदाच अनुभवली आहे.ंमात्र पैशांचा असा नेमका विचार ब:यौपकी सुरु झालेला असला तरी ही जगभरातच ही मिलेनिअल्सची पिढी अतीआत्मविश्वासात आहे , आणि आपल्याला कोरोना होवूच शकत नाही असं बहुतांश तरुण मुलांना वाटतं.यासंदर्भात तरुण मुलांचे कान धरत, जागतिक आरोग्य संघटनेनं अलिकडेच चिंताही व्यक्त केली आहे.संघटनेचे अधिकारी डॉ. ब्रुस अॅलवर्ड यांनी अलिकडेच सांगितलं की, ‘ आजवरच्या तुमच्या किंवा तुमच्या पालकांच्याही आयुष्यात असा जगभर पसरलेला, महामारी ठरलेला आजार कुणाच्याही पाहण्यात नव्हता. त्यामुळे जे र्निदेश सरकार देतं आहे ते ऐका, त्याचं पालन करा! हा आजारच आपल्याला अनोळखी आहे. त्यामुळे आपण तरुण आहोत, आपल्याला काय होतंय, आपण काही मरणार नाही अशा भ्रमात राहू नका. या आजाराचे वाहकही बनू नका.इटली, चिन आणि दुबईचा अभ्यासही हे सांगतो की, कोरोनाची लागण तरुणांना अर्थात जे वयाच्या विशीत, तिशीत, चाळीशीत आहे, त्यांना अधिक होतो. जे अत्यवस्थ होऊन दवाखान्यात दाखल होतात, ते बुजुर्ग असले तरी लागण झालेल्यांत तरुणांचाच समावेश अधिक आहे.त्यामुळे तरुणांना गाफिल राहू नये!’मात्र तरीही जगभरातच ही जनरेशन मिलेनिअल्स घरात बसायला तयार नाही, आपल्याला काही होणार नाही असा त्यांचा अनाठायी समज आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेने तरुणांमध्येच जनजागृती करा असं शासनांना सांगायला सुरुवात केली आहे.