शहरं
Join us  
Trending Stories
1
पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज
2
उडाला भडका, निघाला धूर! अजित पवार गटाचे झिरवाळ, मविआच्या प्रचारसभेला
3
IIT मधून शिक्षण, ओबामांच्याही टीमचा होते भाग; गुरुराज देशपांडेंनी ₹२०८ कोटींचं केलं दान; सुधा मूर्तींशी आहे कनेक्शन
4
संपादकीय: विवेकाला बळ, पण...
5
भेंडवळच्या प्रसिद्ध घटमांडणीचा अंदाज जाहीर, पाऊस, पिकांबाबत केलं असं भाकित 
6
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२४; कोणत्याही अवैध कामापासून दूर राहा, नाहीतर...
7
बारामती: त्या रात्री बँकेत ४० ते ५० जण होते, डीसीसी बँक व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई 
8
डॉक्टर पत्नीला २ प्रियकरांसोबत हॉटेलमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं; पतीनं बेदम मारलं
9
अखेर अकरा वर्षांनी निकाल; अंदुरे, कळसकरला जन्मठेप
10
पंतप्रधानांशी कोणत्याही व्यासपीठावर चर्चेस तयार, ‘इंडिया’ आघाडीचे वादळ येत आहे : राहुल गांधी
11
...‘ते’ तर बालबुद्धी; अजित पवारांवर टीका; शरद पवारांनी धुडकावला मोदींचा सल्ला
12
पवार, ठाकरेंनी शिंदे आणि अजित पवार गटात यावे; पंतप्रधान मोदींचा नंदुरबारच्या सभेत सल्ला
13
केजरीवाल जामिनावर मुक्त, निवडणुकीच्या शेवटच्या चार टप्प्यांमध्ये करणार प्रचार
14
सेक्स स्कँडलमुळे या नेत्यांचेही करिअर झाले उद्ध्वस्त; राजभवनात नकाे ते कृत्य अन् द्यावा लागला राजीनामा
15
अंगठाबहाद्दर म्हणून सरणावर जाणार नसल्याचा आनंद; ठाणे जिल्ह्यात १३ हजार ७७ निरक्षर झाले साक्षरतेच्या परीक्षेत उत्तीर्ण
16
मोदी हिंदी पट्ट्यात लावणार जोर; महाराष्ट्र, प. बंगालवरही फोकस
17
भारताने पाकिस्तानचा आदर केला पाहिजे, त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहे; मणिशंकर अय्यर यांच्या व्हिडीओने वाद 
18
भारताच्या निवडणुकीत अमेरिकेचा हस्तक्षेप? : रशियाचा दावा
19
Vinayak Chaturthi 2024: शनिदेवाची अवकृपा टाळायची असेल तर बाप्पाची उपासना करा, कारण...!
20
देवाच्या नावाने मते काय मागता? महागाई, राेजगारावरही आता बाेला! प्रियांका गांधी यांचे मोदींना आव्हान

CoronaVirus News: खोटारड्या चीनचा बुरखा टराटरा फाटला; 'एकट्या वुहानमध्ये तब्बल 36 हजार लोकांवर अंत्यसंस्कार'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 11:34 AM

23 मार्चपर्यंत, चीनने इतर ठिकाणांवरून वुहानला तब्बल 42,600 डॉक्‍टर्स आणि हेल्‍थवर्कर्स पाठवले. तर तेथे 90 हजार आधीपासूनच उपस्थित होते. मात्र, 23 मार्चपर्यंत चीनने केवळ 50 हजारच कोरोनाबाधित असल्याचे सांगितले.

ठळक मुद्देचीनने वुहानमधील मृतांचा आकडा 2,524 एवढा सांगितला आहे.चीनने वुहानमधील मृतांचा आकडा तब्बल 10 पट कमी करून सांगितला आहे.जानेवारी ते मार्चपर्यंत वुहानमधील स्मशानांत 24 तास अंतिमसंस्कार सुरू होते.

वॉशिंग्टन : चीनमध्ये कोरोना व्हायरसने किती बळी घेतले? जे आकडे ड्रॅगन देत आहे, त्यावर जग विश्वास ठेवायला तयार नाही. एका अभ्यासात दावा करण्यात आला आहे, की चीनने वुहानमधील मृतांचा आकडा तब्बल 10 पट कमी करून सांगितला आहे. चीनने वुहानमधील मृतांचा आकडा 2,524 एवढा सांगितला आहे. मात्र, वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी आणि ओहियो स्‍टेट युनिव्हर्सिटीच्या आभ्यासात म्हणण्यात आले आहे, की वुहानमध्ये जानेवारी ते मार्चदरम्यान तब्बल 36,000 जणांचा मृत्यू झाला. हा अभ्यास वुहानच्या स्मशांमधील डेटावर आधारलेला आहे. 

या अभ्यासात सांगण्यात आले आहे, की जानेवारी ते मार्चपर्यंत वुहानमधील स्मशानांत 24 तास अंतिमसंस्कार सुरू होते. हा अभ्यास medRxivवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. तसेच याचा पीअर रिव्‍ह्यू झालेला नाही.

CoronaVirus News: होऊ नयेत अमेरिकेसारखे हाल; म्हणून, कोरोनावर मात करण्यासाठी मोदी सरकारचा प्लॅन तयार

चीनने सांगितल्यानुसार, वुहानमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला सापडला. मात्र, त्यापूर्वी डिसेंबर 2019मध्येच चीनी मेडिकल फोरम्‍सवर निमोनिया सारख्या आजाराची चर्चा सुरू झाली होती. जानेवारी संपता-संपताच वुहानमधील रुग्णालयांची कंबर तुटली होती. त्यांच्याकडे 90 हजार बेड होते. होटेल्स आणि शाळांमध्ये एक लाख बेड्सची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र तेव्हा चीनचा अधिकृच आकडा केवळ 33,000 एवढाच होता. 23 मार्चपर्यंत, चीनने इतर ठिकाणांवरून वुहानला तब्बल 42,600 डॉक्‍टर्स आणि हेल्‍थवर्कर्स पाठवले. तर तेथे 90 हजार आधीपासूनच उपस्थित होते. मात्र, 23 मार्चपर्यंत चीनने केवळ 50 हजारच कोरोनाबाधित असल्याचे सांगितले.

CoronaVirus News: खुशखबर! मॉडर्नाची कोरोना व्हॅक्सीन अखेरच्या टप्प्यात, 'या' महिन्यात मिळू शकते 'गुड न्यूज'

थरकाप उडवणारे चित्र -या दोन्ही विद्यापीठांनी वुहानमधील आठ स्मशानांचा डेटा एकत्र केला आहे. त्यांच्या मते, 25 जानेवारीपर्यंत या स्मशानांत 24 तास अंत्यसंस्कार सुरू होते. संपूर्ण डेटाच्या आधारे अभ्यासकांनी सांगितले, की वुहानमध्ये चीनच्या आधिकृत आकड्यांपेक्षाही 10 पट रुग्ण समोर आले होते. सर्वसाधारणपणे वुहानमधील स्मशानं केवळ चार तासच खुली राहतात. 90 लाख लोकसंख्या असलेल्या शहरात सर्वसाधारणपणे रोज 136 अंत्यसंस्कार होतात. मात्र तेथे ज्या वेगाने अंत्यसंस्कार होत होते, त्या अनुशंगाने तेथे दिवसाला 816 रुग्णांवर उपचार होत होते. याशिवाय मोबाईल स्मशान वेगळे होते. अभ्यासानुसार अनेकदा वुहानमध्ये रोज 2100 मृत्यूही झाले आहेत.

दिलासादायक! कोरोना होतोय हद्दपार; 'या' 26 देशांमध्ये आता एकही रुग्ण नाही

'चीनने खेळला आकड्यांचा मोठा खेळ' -अभ्यासकांनी येथील अस्थी कलशांचा डेटाही एकत्र केला आहे. यानुसार, जानेवारी ते मार्चदरम्यान जवळपास 36,000 अस्थी कलश विकले गेले. अभ्यासात म्हटले आहे, की सर्व सोर्सेसकडून डेटा मिळवल्यानंतर समोर आले आहे, की वुहानमध्ये 23 मार्चपर्यंत तब्बल 36 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. हा आकडा चीनने जाहीर केलेल्या 2,524पेक्षा 10 पट अधिक आहे. चीनमध्ये 7 फेब्रुवारीपर्यंत कोरोनाचे तब्बल 3,05,000 ते 12 लाख रुग्ण होते. या वेळेपर्यंत 6,800-7,200 लोकांचा मृत्यू झाला होता. मात्र, चीनने 7 फेब्रुवारीपर्यंत केवळ 13,600 रुग्ण आणि 545 मृत्यू सांगितले होते.

CoronaVirus News: आश्चर्य! कोरोना व्हायरस अँटीबॉडीजसह बाळाचा जन्म, डॉक्टर हैराण; रुग्णालय म्हणते...

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनDeathमृत्यूdocterडॉक्टरhospitalहॉस्पिटल