शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: चीननं महिन्याभरानंतर लॉकडाऊन उठवला अन् ज्याची भीती होती तोच प्रकार घडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 15:08 IST

CoronaVirus marathi News: वुहानमधील परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय घेण्यात आला

बीजिंग: चीनच्या वुहानमधून जगभरात कोरोनाचा फैलाव झाला. चीन सरकारनं लॉकडाऊन करत वुहानमधील परिस्थिती नियंत्रणात आणली. महिन्याभरापूर्वी चीननं वुहानमधील लॉकडाऊन उठवला. त्यानंतर आता पुन्हा एकदा वुहानमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रशासनानं वुहानमधील निर्बंध हटवले आणि कार्यालयं सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र जनजीवन पूर्वपदावर येताच कोरोनानं डोकं वर काढलं आहे. वुहानमध्ये कोरोनाचे पाच नवे रुग्ण सापडले आहेत. हे सगळे रुग्ण एकाच परिसरातले आहेत. एका ८९ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली. त्याच्या संपर्कात आल्यानं त्याच्या पत्नीला कोरोनाची बाधा झाली.कोरोनाची बाधा झालेल्या पाचही रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं आढळून आलेली नाही. मात्र त्यांच्या माध्यमातून इतरांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. कोरोनाची लक्षणं दिसून न येणाऱ्या रुग्णांची नेमकी संख्या उपलब्ध नाही. कोरोना चाचणी झाल्यानंतरच अशा रुग्णांची नोंद होते. त्यानंतर त्यांना कोणाच्या माध्यमातून कोरोनाची लागण झाली आणि त्यांच्यामुळे नेमक्या कोणा कोणाला कोरोनाची बाधा झाली, त्याचा शोध घेतला जातो. चीननं कोरोनाबाधितांच्या संख्येत कोणतीही लक्षणं दिसून न येणाऱ्या रुग्णांचा आकडा धरलेला नाही. चीनमध्ये सध्या कोरोनाचे ८२ हजार ९१८ रुग्ण आहेत. वुहानमध्ये लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांची संख्या मोठी आहे. एप्रिलपासून चीनमधील कोरोना रुग्णांची संख्या अतिशय कमी होताना दिसत आहे. फेब्रुवारीत चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले होते. त्यानंतर लॉकडाऊन, चाचण्या, क्वारंटाईन अशी पावलं उचलून चीननं कोरोनार नियंत्रण मिळवलं. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन