शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

वुहानच्या प्रयोगशाळेत बनला मानवनिर्मित कोरोनाचा विषाणू; नोबेल पुरस्कारविजेत्याच्या दाव्यानं खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 07:17 IST

नोबेल पुरस्कारविजेत्या फ्रेंच शास्त्रज्ञाचा दावा

पॅरिस : जगामध्ये सध्या हाहाकार माजवत असलेला कोरोनाचा विषाणू हा मानवनिर्मित आहे. एड्सवरील प्रतिबंधक लस शोधण्याकरिता चिनी प्रयोगशाळेत सुरू असलेल्या संशोधनात हा विषाणू निर्माण करण्यात आला, असा दावा नोबेल पुरस्कार विजेते व फ्रान्सचे विषाणू तज्ज्ञ लुक मॉन्तानिए यांनी केला आहे. त्यामुळे जगभर खळबळ माजली आहे.एड्स विषाणू्च्या संशोधनाबद्दल लूक माँटेग्नर व दोन शास्त्रज्ञांना २००८ मध्ये मेडीसिन या विषयासाठीचा नोबेल पुरस्कार विभागून देण्यात आला होता. लुक मॉन्तानिए यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, कोरोनाच्या विषाणूमध्ये एचआयव्हीचे अंश व मलेरियाचे जंतूही आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूची नैसर्गिकरीत्या उत्पत्ती झालेली नाही या संशयाला बळकटी मिळते. मात्र, मॉन्तानिए यांचा हा दावा पॅरिसमधीलच काही विषाणूतज्ज्ञांनी फेटाळून लावला आहे.मॉन्तानिए यांनी सांगितले की, वुहान राष्ट्रीय जैवसुरक्षा प्रयोगशाळेत (डब्ल्यूएनबीएल) कोणाकडून तरी अपघाताने हा विषाणू वातावरणात मिसळला असावा. त्यानंतर या विषाणूने जगात अनेकांचे बळी घेतले. कोरोनाच्या विषाणूची निर्मिती चीनच्या प्रयोगशाळेत झाली होती का, याचा अमेरिका तपास करत आहे असे त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच सांगितले.कोरोनाचा विषाणू वातावरणात मिसळला कसा? त्याने अमेरिकेसह काही देशांत इतके भयंकर तांडव कसे केले, या सगळ्या गोष्टींचा आम्ही छडा लावणार आहोत, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पेओ यांनीही म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर मॉन्तानिए यांनी केलेले वक्तव्य लक्षवेधी ठरले आहे. ते म्हणाले की, संसर्गजन्य रोग पसरविण्याची मोठी ताकद असलेले अनेक विषाणू वुहानमधील प्रयोगशाळेत आहे याची अमेरिकेला नीट कल्पना आहे.लुक मॉन्तानिए यांचे काही संशोधन वादग्रस्तनोबेल पुरस्कारविजेते असले, तरी लुक मॉन्तानिए यांचे काही संशोधन वादग्रस्तही ठरले आहे. डीएनएमधून बाहेर पडणाऱ्या विद्युतलहरी, पपई ही पार्किन्सन, एड्स या आजारांवरील उपचारांत गुणकारी आहे, अशा विषयांवर मॉन्तानिए यांनी लिहिलेल्या शोधनिबंधातील निष्कर्षांवर काही शास्त्रज्ञांनी कडाडून टीका केली होती.चीनला गंभीर परिणाम भोगावे लागतील : डोनाल्ड ट्रम्पकोरोना विषाणूची साथ पसरण्यास चीनने जाणूनबुजून केलेली कृत्ये कारणीभूत असल्यास त्याचे गंभीर परिणाम या देशाला भोगावे लागतील, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी दिला आहे. ते म्हणाले की, कोरोना साथीच्या प्रारंभीच्या टप्प्यात ती थांबविता येणे चीनला शक्य होते, पण त्यांनी ते केले नाही. त्याचा खूप मोठा फटका जगाला सहन करावा लागत आहे. एखादे कृत्य मुद्दामहून करणे व हातून चूक होणे या दोन गोष्टीत खूप फरक असतो. जाणूनबुजून चुकीच्या गोष्टी करणाऱ्यांना अद्दल घडवायला हवी. कोरोना विषाणू व साथीबद्दलची अमेरिकेला हवी असलेली सविस्तर माहिती चीनने कधीच दिली नाही. आम्हाला या प्रकरणापासून दूर ठेवले. कोरोना साथीने जगाला तडाखा दिल्यानंतर, त्याची चीन आता चौकशी करत आहे. त्यांच्या चौकशीत काय निघते, याकडे साऱ्या जगाचे लक्ष आहे असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन