शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: लॉकडाऊन काढल्यास अमेरिकेत अनेक मृत्यू होतील, मोठे आर्थिक नुकसानही होण्याचा व्यक्त केला अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 05:44 IST

लॉकडाऊनचे निर्बंध हटविण्याची घाई केल्यास कोविड-१९ ने अधिक लोकांचा मृत्यू होईल, तसेच मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही होईल, असा स्पष्ट इशारा अमेरिकी सरकारचे वरिष्ठ संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. अ‍ॅन्थोनी फॉसी यांनी दिला आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेतील राज्य आणि शहरांतील कोरोना विषाणूंचा फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे निर्बंध हटविण्याची घाई केल्यास कोविड-१९ ने अधिक लोकांचा मृत्यू होईल, तसेच मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही होईल, असा स्पष्ट इशारा अमेरिकी सरकारचे वरिष्ठ संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. अ‍ॅन्थोनी फॉसी यांनी दिला आहे.खरा धोका हा आहे की, या संसर्गजन्य रोगाचा फैलाव एवढा होईल की, तो आटोक्यात आणणे कठीण होईल, असा इशारा डॉ. फॉसी यांनी संसदीय समिती आणि अमेरिकेला दिला आहे. त्यांनी दिलेला इशारा राष्टÑाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेच्या अगदी विरुद्ध आहे. अमेरिकेतील २४ राज्यांनी अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी लॉकडाऊन हटविणे सुरू केले आहे.लॉकडाऊनमुळे अमेरिकेत जवळपास तीन कोटींहून अधिक लोक बेरोजगार झाल्याने ट्रम्प प्रशासन राज्यांतील व्यवहार सुरू करण्यावर भर देत आहे.असोसिएटेड प्रेसच्या आढाव्यानुसार अमेरिकेतील १७ राज्य निर्बंध शिथिल करण्यासंबंधीचे व्हाईट हाऊसचे निकष पूर्ण करीत नाहीत. कारण या राज्यांत संसर्गाचा दर १४ दिवसांत कमी होताना दिसत नाही.नवीन रूग्ण वाढतीलकोरोना रोगाच्या जगव्यापी साथीचे गांभीर्य स्पष्ट करताना डॉ. फॉसी आणि अन्य तज्ज्ञांनी घरूनच संसदेच्या आरोग्य, शिक्षण, कामगार समितीपुढे निवेदन केले.लोक घरांतून काम, धंदा आणि अन्य व्यवहारांसाठी बाहेर पडल्यास संसर्गित नवीन रुग्णांची संख्या वाढेल आणि अधिक लोक मृत्यू पावतील.संसर्ग रोखण्याचा प्रयत्न केल्यास नवीन रुग्ण आढळणार नाहीत; परंतु लॉकडाऊनचे निर्बंध हटविल्यास त्याचे गंभीर परिणाम होणे निश्चित आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUnited Statesअमेरिका