शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

CoronaVirus, LockdownNews: लॉकडाउनचं उल्लंघन करणाऱ्यांना उघडं करून मारतोय 'ड्रग लॉर्ड' अल चापोचा मुलगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 16:49 IST

जगातील सर्वात क्रूर ड्रग लॉर्डपैकी एक मॅक्सिकन ड्रग माफिया अल चापोच्या मुलांनी आता लॉकडाउनचे उल्लंघन करणाऱ्यांना केवळ इशाराच नाही, तर उघडे करून मारतानाचे काही व्हिडिओही शेअर केले आहेत.

ठळक मुद्देमॅक्सिकोमध्ये प्रसिद्ध सिनालोआ ड्रग कार्टेलची जबाबदारी आता अल चापोची मुले सांभाळत आहेतसिनालोआमध्ये सरकारने कर्फ्यू लागू केलेला नाही, मात्र घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहेरात्री 10 वाजेनंतर घरातून कसल्याही प्रकारच्या कामासाठी बाहेर निघण्यावर पूर्णपणे बंदी आहे

मेक्सिको : जगातील सर्वात क्रूर ड्रग लॉर्डपैकी एक मॅक्सिकन ड्रग माफिया अल चापोच्या मुलाने शहरात लॉकडाउन लागू करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. मॅक्सिकोमध्ये प्रसिद्ध सिनालोआ ड्रग कार्टेलची जबाबदारी आता अल चापोची मुले आर्चीवाल्डो गजमॅन आणि जीजस अल्फ्रेडो हे सांभाळत आहेत. या दोघांनी आता लॉकडाउनचे उल्लंघन करणाऱ्यांना केवळ इशाराच नाही, तर उघडे करून मारतानाचे काही व्हिडिओही शेअर केले आहेत.

आणखी वाचा -  'त्या' विमान कंपनीकडून सगळे नियम धाब्यावर; अनेक देशांत पोहोचला कोरोनाचा कहर

डेली स्टारमध्ये आलेल्या एका वृत्तानुसार, मॅक्सिकोच्या सिनलोआ भागात कोरोना संक्रमानापासून संक्षण म्हणून लॉकडाउन लागू करणे आणि गरिबांसाठी मदत कार्य सुरू करण्यात ड्रग कार्टेलदेखील सहभाग घेत आहे. सिनालोआची राजधानी कलिकनमध्ये तर कार्टेलने मुलांनाही तैनात केले आहे. जे लोक लॉकडाउनचे उल्लंघन करत आहेत. त्यांना केवळ इशाराच नाही, तर मारहाणही केली जात आहे.

टिकटॉकवर शेअर करतायेत व्हिडिओ -कार्टेलचे लोक रात्री 10 वाजेनंतर घरातून बाहेर पडणाऱ्यांना केवळ मारतच नाही, तर त्यांचे व्हिडिओही टिकटॉकवर अपलोड करत आहेत. एवढेच नाही, तर या व्हिडिओसोबत एक इशाराही दिला जात आहे, की लॉकडाउनचे उल्लंघन केले तर हीच शिक्षा देण्यात येईल. या व्हिडिओच्या अखेरीस सांगण्यात आले आहे, की हा काही खेळ नाही. आम्ही खेळ खेळत नाहीओत. समोर आलेल्या दोन लोकांनी तर लॉकडाउनचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना दोन दिवस मारहाण करण्यात आल्याचेही सांगितले आहे. तसेच फाइन म्हणून त्यांच्याकडून पैसेही घेण्यात आले आहेत. त्यांना काठी आणि लोखंडाच्या रॉडने मारहान करण्यात आली, असेही ते म्हणाले.

आणखी वाचा - तो किम नव्हेच! २० दिवसांनंतर समोर आला किम जोंग उनचा ड्युप्लीकेट?; चर्चेला पुन्हा उधाण

सिनालोआमध्ये  कर्फ्यू नाही -सिनालोआमध्ये सरकारने कर्फ्यू लागू केलेला नाही, मात्र घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच रात्री 10 वाजेनंतर घरातून कसल्याही प्रकारच्या कामासाठी बाहेर निघण्यावर पूर्णपणे बंदी आहे. कार्टेल लॉकडाउन लागू करण्याबरोबरच लोकांना सढळहाताने मदतही करत आहे. गेल्या महिन्यात अल चापोच्या मुलीचा एक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात ती मदत म्हणून आवश्यक वस्तू, आणि पैसे वाटताना दिसत आहेत. यावेळी तिने अमेरिकेतील कारागृहात बंद असलेल्या आपल्या वडिलांचा फोटोही हातात घेतलेला होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMexicoमेक्सिकोDrugsअमली पदार्थjailतुरुंगAmericaअमेरिका