शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

coronavirus: इटलीत पुन्हा लाॅकडाऊनचे बिगूल, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे चिंतेचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2020 07:14 IST

coronavirus News: कोरोना प्रकोपातून सावरत असलेल्या युरोपला पुन्हा या संक्रमणाचा वेढा पडला आहे. युरोपात दाखल झालेली थंडी कोरोनासाठी पोषक ठरण्याची भीती आहे. त्यामुळे पारा घसरत असला तरी सरकार आणि लोकांना कोरोनाच्या भीतीने घाम फुटला आहे. या पार्श्वभूमीवर इथल्या काही देशांमध्ये वास्तव्याला असलेल्या भारतीयांशी बोलून परिस्थितीचा कानोसा घेण्याचा प्रयत्न करणारी ही वृत्त मालिका...

मुंबई : कोरोना संक्रमणाच्या पहिल्या टप्प्यात इटलीने मृत्यूचे थैमान अनुभवले, परंतु त्या वेळी कधीही फारशी भीती वाटली नव्हती. मात्र, कार्यालयातील माझ्या सहकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे आजच निष्पन्न झाले. एका शाळेतील विद्यार्थीही संशयास्पद आढळला. त्यामुळे माझ्या मनात कधी नव्हे एवढे चिंतेचे काहूर माजले आहे. देशात पुन्हा लाॅकडाऊनचे बिगूल वाजत आहे. हिवाळ्यात कोरोनाच्या झळा तीव्र होण्याची भीती आहे. परिस्थिती चिंताजनक असून पुढील काही महिने आमच्यासाठी कसोटीचे असतील, असे इटलीत वास्तव्याला असलेले प्रवीण जगदाळे यांनी अस्वस्थता मांडताना ‘लोकमत’ला सांगितले.मे महिन्यात इटलीत दिवसाकाठी १२-१२ हजार रुग्ण आढळत होते. त्यापैकी ८०० ते ९०० जणांचा मृत्यू होत होता. मृतदेहांचे दफन शक्य होत नसल्याने विद्युत दाहिन्या सुरू झाल्या होत्या. परंतु, सुदैवाने ही लाट हळूहळू ओसरली. सप्टेंबर, ऑक्टाेबर महिन्यांत रुग्णसंख्या शंभराच्या पलीकडेही जात नव्हती. निर्बंध कमी झाले. जनजीवन पूर्वपदावर येत होते. उन्हाळी सुट्टीत पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारने चक्क सवलतींचे पॅकेज जाहीर केले. त्यामुळे सहलींचा आनंद लुटण्यासाठी समुद्रकिनाऱ्यांवर तुफान गर्दी लोटली. अनेक जणांनी परदेशी वाऱ्या केल्या. तेथेच घात झाला आणि कोरोनाने पुन्हा हातपाय पसरण्यास सुरुवात केली असे मला वाटते.ऑक्टोबरच्या उत्तरार्धात जणू कोरोनाही सुट्टी संपवून पुन्हा दाखल झाला आहे. दैनंदिन रुग्णसंख्या २०-२२ हजारांचा पल्ला ओलांडतेय. परंतु, मृतांची संख्या २०० च्या पुढे जात नाही हे सुदैव आहे. मृतांमध्ये ज्येष्ठांचा भरणा जास्त असून ओल्डएज होममध्येच ते राहतात. त्यांनाच सर्वाधिक धोका असल्याने त्यांची काळजी घेणे जास्त महत्त्वाचे असल्याचे जगदाळे म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याItalyइटलीInternationalआंतरराष्ट्रीयHealthआरोग्य