शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: निर्बंध उठविताना काळजी न घेतल्यास पुन्हा लॉकडाऊन; देशांना सावध राहण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 07:11 IST

निर्बंध शिथिल केल्यास किंवा टप्प्याटप्प्याने हटविल्यास पुन्हा या साथीची लागण होण्याचा धोका कितपत आहे, याचा अंदाज घ्या.

जीनिव्हा : ‘कोविड-१९’ या संसर्गजन्य आजाराचा प्रसार रोखण्यासाठी लागू केलेले निर्बंध विविध देशांनी टप्प्याटप्प्याने मागे घेताना अतिशय काळजी घेतली पाहिजे. अन्यथा, पुन्हा लॉकडाऊन करण्याची पाळी त्या देशांवर येऊ शकते, असा गंभीर इशारा जागतिक आरोग्य संघटनेने गुरुवारी दिला.

अमेरिका, चीन, ब्रिटनसह काही देशांनी लॉकडाऊनचे निर्बंध काही ठिकाणी शिथिल करण्याचे तसेच काही ठिकाणी ते टप्प्याटप्प्याने मागे घेण्याचे ठरविले आहे. या देशांना सावधानतेचा इशारा देताना जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक टेड्रोस अधनोम घेब्रेसिस म्हणाले, ‘‘कोणत्याही देशाने लॉकडाऊनमधील निर्बंध मागे घेताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. या महाभयंकर साथीचा मुकाबला करण्यासाठी आरोग्यव्यवस्था अतिशय सक्षम बनवावी.’’

निर्बंध शिथिल केल्यास किंवा टप्प्याटप्प्याने हटविल्यास पुन्हा या साथीची लागण होण्याचा धोका कितपत आहे, याचा अंदाज घ्या. त्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यासाठी पावले टाका, अशी महत्त्वपूर्ण सूचनादेखील घेब्रेसिस यांनी लॉकडाऊन हटविण्याची इच्छा बाळगणाऱ्या देशांना केली. कोरोना विषाणूचा माणसांमध्ये मोठ्या प्रमाणावर होणाºया संसर्गाबाबत जागतिक आरोग्य संघटनेने जगाला गेल्या जानेवारीमध्येच सावध केले होते. मात्र, बहुतांश देशांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या या सूचनेकडे गंभीरपणे लक्ष दिले नाही. 

‘कोविड-१९’वरून अमेरिका-चीन वादया साथीच्या काळात जागतिक आरोग्य संघटनेने चीनला नेहमीच झुकते माप दिले, असा आरोप अमेरिकेने केला होता. त्यानंतर या संघटनेला अमेरिकेकडून दिला जाणारा निधी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी रोखला. दुसरीकडे, चीनने या संघटनेला काही प्रमाणात निधी दिला.कोरोना विषाणूची निर्मिती चीनमधील एका प्रयोगशाळेत झाली असल्याचे पुरावे आपल्या हाती लागले आहेत, असा दावा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पाम्पेओ यांनी केला होता. मात्र, त्यांचा हा दावा चीनने स्पष्ट शब्दांत फेटाळून लावताना असा आरोप करणारे पॉम्पेओ हे अविवेकी असल्याची टीका केली होती. ‘कोविड-१९’च्या साथीमुळे अमेरिकेत प्रचंड वित्त व जीवित हानी झाली. यामुळे अमेरिका चीनवर सतत आगपाखड करीत आहे. दोन्ही देशांतील वादंगाने सध्या उग्र रूप धारण केले आहे.

टॅग्स :World health organisationजागतिक आरोग्य संघटनाcorona virusकोरोना वायरस बातम्या