शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
4
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
5
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
6
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
7
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
8
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
9
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
10
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
11
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
12
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
13
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
14
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
15
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
16
अभिमानास्पद! मित्रांनी वडिलांची उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवतेय फुटबॉलचं मैदान
17
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
18
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
19
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
20
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...

CoronaVirus Live Updates : भीषण, भयंकर, भयावह! 'या' ठिकाणी रुग्णालयात मृतदेहांचा खच; अंत्यसंस्कारासाठी एप्रिलपर्यंत वेटिंग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 17:44 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचे थैमान पाहायला मिळत असून अत्यंत भीषण परिस्थिती आहे. मृतांचा आकडा धडकी भरवणारा आहे.

जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. वाढत्या रुग्णसंख्येने अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. मृतांच्या आकड्यात मोठी वाढ झाली असून वेगाने कोरोनाचा प्रसार होत आहे. हाँगकाँगमध्ये कोरोनाचे थैमान पाहायला मिळत असून अत्यंत भीषण परिस्थिती आहे. मृतांचा आकडा धडकी भरवणारा आहे. धक्कादायक बाब म्हणजे एप्रिलपर्यंत अंत्यसंस्कार करण्यात येतं ते ठिकाण बूक करण्यात आलं आहे. त्यामुळे प्रतीक्षा करावी लागणार आहे. रुग्णालयांमध्ये मृतदेहांचा खच पडलेला पाहायला मिळत आहे. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात सिंपल फेयरवेल सेरेमनी बंद असल्यामुळे आणि डेथ डॉक्युमेंट्ससाठी मोठी प्रोसेस असल्याने जास्तीचा वेळ लागत आहे. रिपोर्टनुसार, मृतदेहाबाबतची कागदपत्र तयार होण्यासाठी दहा दिवस लागत आहेत. याच दरम्यान सोशल मीडियावर एक फोटो जोरदार व्हायरल होत असून त्यामध्ये रुग्णालयामध्ये रुग्ण असताना देखील खाली मृतदेह पिशवीत पॅक केलेले दिसत आहेत. रुग्णालयाने याबाबत रुग्णांची माफी मागितली आहे. फ्यूनरल बिझनेस असोसिएशन इंडस्ट्री ग्रुपचे चेअरमन क्वोक होय-बोंग यांनी अंत्यसंस्कार करताना समस्या निर्माण होऊ नये म्हणून सरकारने काहीतरी करायला हवं.

फक्त 121 फ्यूनरल हॉल आहेत पण रोज 200 हून अधिक लोकांचा मृत्यू

अंत्यसंस्कार करण्यात येतं ते ठिकाण बूक झालं आहे. एप्रिलपर्यंत स्लॉट नाही. शहरात फक्त 121 फ्यूनरल हॉल आहेत पण रोज 200 हून अधिक लोकांचा मृत्यू होत आहे. हाँगकाँगमध्ये 300000 लोकांना घरामध्ये आयसोलेट करण्यात आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. चीनमध्ये कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा कहर केला आहे. गेल्या दोन वर्षांत सर्वाधिक कोरोना संसर्गाची प्रकरणे नोंदली गेली आहेत. कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यानंतर चीनमधील जिलीन शहरात तात्पुरते रुग्णालय बांधले जात आहे. हे रुग्णालय सहा दिवसांत तयार करण्यात येत असून सहा हजार बेड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सरकारी शिन्हुआ वृत्तसंस्थेने शेअर केलेला व्हिडिओमध्ये ईशान्य चीनच्या जिलीन प्रांतांतर्गत येणाऱ्या शहरातील रुग्णालयाचे बांधकाम पाहायला मिळत आहे. 

कोरोनाचा प्रकोप! चीन 6 दिवसांत तयार करतंय 6000 बेडचं रुग्णालय; रुग्णसंख्येने वाढवली चिंता

12 मार्चपर्यंत या भागात तीन तात्पुरती रुग्णालये आधीच बांधली गेली आहेत. चीनमध्ये कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा कहर केला आहे. गेल्या दोन वर्षांत सर्वाधिक कोरोना संसर्गाची प्रकरणे नोंदली गेली आहेत. कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यानंतर चीनमधील जिलीन शहरात तात्पुरते रुग्णालय बांधले जात आहे. हे रुग्णालय सहा दिवसांत तयार करण्यात येत असून सहा हजार बेड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सरकारी शिन्हुआ वृत्तसंस्थेने शेअर केलेला व्हिडिओमध्ये ईशान्य चीनच्या जिलीन प्रांतांतर्गत येणाऱ्या शहरातील रुग्णालयाचे बांधकाम पाहायला मिळत आहे. 12 मार्चपर्यंत या भागात तीन तात्पुरती रुग्णालये आधीच बांधली गेली आहेत. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन