शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

Coronavirus: जाणून घ्या, कोरोनामुळे मलेशियात हाहाकार; लोकांनी घरावर सफेद झेंडे का फडकवले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 12:36 IST

मागील आठवड्यापासून लोकांनी घरावर सफेद रंगाचा झेंडा लावण्यास सुरूवात केली आहे.

ठळक मुद्देवाढत्या कोरोना संक्रमणामुळे मलेशिया सरकारची चिंता वाढली. मृत्यूदर कमी करण्यासाठी मलेशियात कडक लॉकडाऊन लावण्यात आलं आहे. कोरोना आणि सफेद झेंडा यामागे काय आहे कनेक्शन?

मलेशियामध्ये सध्या अनेक घरांवर पांढऱ्या रंगाचा ध्वज फडकताना दिसत आहे. हा त्या देशाचा झेंडा नाही परंतु एका विशेष कारणामुळे लोकांच्या घरावर हा झेंडा फडकतोय. कोरोनामुळे मलेशिया या देशाची अवस्था अंत्यंत बिकट झाली आहे. देशात कडक लॉकडाऊन लावण्यात आले आहे. अशात रोजगार बंद झाल्याने अनेकांच्या घरी खाण्यापिण्याचंही सामान नाही. त्यामुळे मदत मागण्यासाठी या लोकांनी घरावर सफेद रंगाचा झेंडा फडकवला आहे. या झेंड्याला White Flag Campaign असंही म्हटलं जातं.

कोरोनाच्या विळख्यात अडकलं मलेशिया

मंगळवारी मलेशियात कोरोनाचे ७ हजाराहून अधिक रुग्ण आढळले. गेल्या महिन्याभरात हा सर्वाधिक आकडा आहे. राजधानी कुआलालंपूरमध्ये १५ पेक्षा अधिक रुग्ण आढळले. ताज्या आकडेवारीनुसार संक्रमणाची वाढणारी संख्या आणि मृत्यूच्या वाढत्या संख्येने चिंतेत असणाऱ्या सरकारने देशात कडक लॉकडाऊन लावला आहे. ही आहे मलेशियातील कोरोना संक्रमणाची परिस्थिती परंतु याचं सफेद झेंड्यासोबत मोठं कनेक्शन आहे.

सफेद झेंडा आणि कोरोनाचं कनेक्शन काय?

मागील आठवड्यापासून लोकांनी घरावर सफेद रंगाचा झेंडा लावण्यास सुरूवात केली आहे. याचा अर्थ ज्या घरावर झेंडा लावला आहे त्याच्या घरात खाण्यापिण्याची समस्या अथवा कुणी आरोग्य समस्येने त्रस्त आहे. हा झेंडा किंवा सफेद कपडाही असू शकतो. (white flag in Malaysia linked with Covid) हा झेंडा पाहून आसपासचे लोक आणि आरोग्य विभागही सतर्क होऊन तात्काळ मदत घेऊन त्याच्या घरी पोहचू शकतं. लॉकडाऊन काळात अत्यावश्यक काम वगळता लोकांना बाहेर पडण्यास बंदी आहे. त्यामुळे लोकांना मदत करण्यासाठी सफेद रंगाचा झेंडा खूप फायदेशीर ठरत असल्याचं बोललं जात आहे.

याशिवाय एक SOS अँपही विकसित

 या अँपच्या माध्यमातून मलेशियातील त्या फूड बँकेचा वापर करू शकतो ज्याठिकाणाहून लोकांना मोफत चविष्ट अन्न पुरवलं जातं. केवळ सामाजिक संस्था नाही तर मलेशियातील पेनेंग प्रांतातील मच्छिमारही लोकांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. ते ताजे मासे गरजू लोकांकडे पोहचवतात ज्यामुळे त्यांना आहार मिळू शकेल. ही सगळी मदत अशा लोकांसाठी मिळते ज्यांनी त्यांच्या घरावर सफेद रंगाचा झेंडा फडकवला आहे. लॉकडाऊन काळात जे कुणी त्रस्त आहेत, जगण्यासाठी संघर्ष करत आहेत अशा लोकांनी त्यांच्या घरावर पांढऱ्या रंगाचा झेंडा लावला आहे.

सफेंद झेंडाच का?

सफेद रंगामागेही एक इतिहास आहे. आतापर्यंत सफेद रंगाचा वापर शांती आणि युद्धविरामसाठी वापरला जातो. जर कुणी सफेद रंगाचा झेंडा वापरला तर त्याचा अर्थ त्याच्यावर आक्रमण करू नका. शांतीने चर्चा करा. मलेशियात या रंगाचा झेंडा वापरण्यामागे लोकांनी त्यांची मदत करावी असा आहे. मलेशियात काळा झेंडाही फडकवण्यात आला आहे. ज्या लोकांना सरकारविरोधात राग आहे.विद्यमान पंतप्रधान मोहिउद्दीन यासीन यांनी सत्तेतून पायउतार व्हावं यासाठी काळे झेंडे लावले होते. पोलीस सध्या या सगळ्यांची चौकशी करत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या