शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

coronavirus : इम्युनिटी पासपोर्ट?, जागतिक आरोग्य संघटनेचा धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 06:27 IST

जर्मनी आणि चिली यांसारख्या देशांनी तर कोरोनातून बरे झालेल्या लोकांना चक्क ‘इम्युनिटी पासपोर्ट’ देण्याचं जाहीर केलं आहे.

जगात लक्षावधी लोकांना कोरोनाची बाधा झाली, त्याचप्रमाणे लाखो लोक कोरोनातून मुक्तही झाले. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरीही सोडण्यात आलं; पण एकदा कोरोनाची लागण झाली म्हणजे पुन्हा दुसऱ्यांदा तुम्हाला त्याची लागण होत नाही, असा समज अनेक लोकांमध्ये अगदी डॉक्टर आणि काही संशोधकांमध्येही आहे, त्यामुळे एकदा कोरोनाची लागण होऊन गेली म्हणजे आता आपल्याला, त्या व्यक्तीला त्याचा काहीच धोका नाही आणि काहीही करायला, बाहेर फिरायला आपल्याला आता मुक्त परवाना मिळाला आहे, असाच अनेकांचा समज आहे. अगदी विविध सरकारांनीही त्याला पुष्टी देताना कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींना बाहेर जाण्यासाठी सूट दिली आहे. जर्मनी आणि चिली यांसारख्या देशांनी तर कोरोनातून बरे झालेल्या लोकांना चक्क ‘इम्युनिटी पासपोर्ट’ देण्याचं जाहीर केलं आहे.काय आहे हा इम्युनिटी पासपोर्ट?याचा अर्थ जे लोक कोरोनामुक्त झाले आहेत, त्यांना एकप्रकारचा पासपोर्ट देणं. म्हणजेच कोरोनाकाळात इतरांवर जी बंधनं लादली गेली आहेत, त्यांच्या बाहेर जाण्यावर, इतर कोणत्याही गोष्टी करण्यावर ज्या मर्यादा आल्या, आणल्या आहेत, त्यातून या व्यक्तींना सूट देणं. त्यांना बाहेर पडण्यास, कामावर जाण्यास मोकळीक देणं!पण यासदंर्भात जागतिक आरोग्य संघटनेनं कालच तातडीचं एक निवेदन प्रसिद्ध केलं असून, जगातल्या सर्वच देशांना त्यांनी याबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे, एकदा कोरोना होऊन गेला म्हणजे तो तुम्हाला पुन्हा होणार नाही, याची काहीही शाश्वती नाही. त्याला काही शास्त्रीय आधारही नाही. उलट अशा कृतींमुळे कोरोनाला अटकाव करण्याचा जो प्रयत्न त्या त्या देशांनी आजवर केला आहे, तो उलटण्याचीच शक्यता आहे आणि आजवर केलेल्या साºया प्रयत्नांवर पाणी फिरेल, त्यामुळे ज्या देशांनी कोरोनातून बरे झालेल्या लोकांना ‘मुक्त परवाना’ देण्याचा विचार केला असेल किंवा असे परवाने दिले असतील, तर त्यांनी ते तातडीने मागे घ्यावेत.ज्या लोकांना आधी कोरोना होऊन गेला आणि उपचारानंतर ते बरे झालेत, अशा लोकांना पुन्हा कोरोना होण्याचं प्रमाण कमी आहे, हे आतापर्यंतच्या निरीक्षणातून दिसून आलेलं आहे; पण ते अजून सिद्ध झालेलं नाही; त्यासाठी आणखी संशोधन करण्याची गरज आहे. त्यानंतरच याबाबत ठोस काही सांगता येईल; पण तोपर्यंत तरी कोणीही या गैरसमजात राहू नये, अन्यथा कोरोनाचा झंझावात पुन्हा सुरू झाला तर त्याला आवरणं मग अशक्यप्राय होऊन बसेल, असा सावधानतेचा इशाराही जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे.त्यामुळे जर्मनी आणि चिली यांसारख्या ज्या देशांनी आपल्या नागरिकांना ‘इम्युनिटी पासपोर्ट’ दिले आहेत, त्यांना आपल्या निर्णयाचा आता पुनर्विचार करावा लागणार आहे; पण चिलीने हा इशारा धुडकावताना नागरिकांना अशी प्रमाणपत्रे देण्याचं जाहीर केलं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या