शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

CoronaVirus ...तर नाईलाजाने अमेरिकी काँग्रेसची सभागृहे भंग करेन; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 13:17 IST

अमेरिकन नागरिक संकटात असताना हे सहन करू शकत नाहीत. हा एक घोटाळाच आहे आणि तो अनेक वर्षांपासून केला जात असल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केला. 

वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र, अशातच कोरोना व्हायरसने पाय पसरल्याने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दोन मोर्चांवर एकाचवेळी लढावे लागत आहे. डब्ल्यूएचओला निधी न देण्याचा निर्णय घेतल्यानंतर ट्रम्प यांनी थेट अमेरिकेच्या सर्वोच्च संसदेलाच धमकी दिली आहे. 

आपल्या काही उमेदवारांची नियुक्ती न झाल्याने कामकाजामध्ये अडचणी येत आहेत. त्यांच्या उमेदवारीला संमती न दिल्यास अमेरिकी सिनेटची दोन्ही सभागृहे भंग करेन, अशी थेट धमकीच दिली आहे. ट्रम्प हे वादग्रस्त निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या आणि काँग्रेसमध्ये नेहमीच वादाची ठिणगी उडत आलेली आहे. व्हाईट हाऊसमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी जर सभागृहाने माझे ऐकले नाही तर मी माझ्या संविधानिक अधिकारांचा वापर करन काँग्रेसच्या दोन्ही सदनांना भंग करेन, असे रागाने म्हटले आहे. 

प्रो फॉर्मा सत्रावेळी शहर सोडून जाणे म्हणजे कर्तव्यामध्ये कसूर केल्यासारखे आहे. अमेरिकन नागरिक संकटात असताना हे सहन करू शकत नाहीत. हा एक घोटाळाच आहे आणि तो अनेक वर्षांपासून केला जात असल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केला. सध्याच्या परिस्थितीमुळे अडचणी आल्याने १२९ उमेदवारांचे सदस्यत्व अडकलेले आहे. त्यातील अधिकतर नामांकने रिक्त जागांसाठी आहे. या जागा कोरोनामुळे आलेल्या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी भरायला हव्यात. यामध्ये काही महत्वाची पदेही आहेत, असे ट्रम्प यांनी सांगितले.

राष्ट्रीय गुप्तचर विभागाचे संचालक, फेडरल रिझर्व्ह बोर्डाचे सदस्य आणि संयुक्त राज्यांच्या आर्थिक व्यवहारांसाठी ट्रेझरी या जागा रिक्त आहेत. त्यांची नियुक्ती करण्याचा आपल्याला अधिकार आहे. सीनेटनी कर्तव्याचे पालन करत त्यांना मतदान करावे. नाहीतर मी या जागा स्थगित करून तात्पुरते अधिकार आणि नियुक्त्या करेन, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पcorona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका