शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
4
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
5
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
6
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
7
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
8
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
9
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
10
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
11
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
12
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
13
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
14
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
15
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
16
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
17
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
18
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
19
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
20
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

CoronaVirus: चिंताजनक! अमेरिकेत दर पाचवी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 06:48 IST

३९ लाखांवर नागरिकांची केली तपासणी, बाधितांची संख्या ७.६५ लाखांपुढे

- विशाल शिर्केपुणे : जगभरातील एकूण कोरोना (कोविड-१९) बाधितांपैकी तब्बल तीस टक्के रुग्ण असलेल्या अमेरिकेत अधिकाधिक नागरिकांची चाचणी करण्यावर भर दिला जात आहे. अमेरिकेतील तब्बल चाळीस राज्यांमधे नागरिकांच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. सोमवार अखेरीस (दि. २०) ३८ लाख ८२ हजार २ चाचण्या घेण्यात आल्या होत्या. अमेरिकेतील बाधितांची संख्या साडेसात लाखांवर गेली आहे. याचाच अर्थ घेतल्या जाणाऱ्या चाचण्यांपैकी दर पाचवी चाचणी पॉझिटीव्ह (कोरोनाबाधित) असल्याचे समोर येत आहे.चीन आणि भारतानंतर लोकसंख्येत अमेरिकेचा क्रमांक लागतो. पहिल्या आणि दुसºया क्रमांकावरील दोन्ही देशांची लोकसंख्ये प्रत्येकी १३३ कोटींच्या पुढे आहे. तर, अमेरिकेची लोकसंख्या ३३ कोटींवर आहे. सर्वाधित लोकसंख्या असलेल्या आणि सामाजिक जीवनमान तुलनेने खालावले असलेल्या भारतामधे कोरोनाचा फैलाव वेगाने होईल, असे सांगण्यात येत होते. मात्र, देशात राबविलेल्या उपाययोजनांमुळे अजूनही भारताने कोरोनाला हात-पाय पसरूदिलेले नाहीत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील बाधितांचा वेग इतर देशांच्या तुलनेत ४० टक्क्यांनी घटल्याचे सांगितले आहे. त्यामुळे भारतातील बाधितांची संख्या १८ हजारांच्या आसपास आहे. चीनमधे बाधितांचा आकडा ८५ हजारांच्या घरात आहे. या देशाने नवीन रुग्णांची संख्या शंभराच्या आत आटोक्यात आणण्यात यश मिळविले आहे.सोमवारी दुपारपर्यंत जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या २४ लाख ६ हजार ७४५ वर पोहोचली होती. त्या पैकी अमेरिकेतील बाधितांचा आकडा ७ लाख ५९ हजार ६९६ वर गेला होता. अमेरिकेसह जगभरातील बाधितांमधे सातत्याने वाढच होत आहे. इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेत रुग्णसंख्या वाढत असल्याने, अमेरिकेने चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर दिला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क सिटी आणि कॅलिफोर्निया स्टेटला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. न्यूयॉर्कमधे तब्बल सव्वासहा लाख नागरिकांच्या चाचण्या घेण्यात आल्या असून, कॅलिफोर्नियामधे पावणेतीन लाखांहून अधिक चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. टेक्सास, न्यू जर्सी, मॅसॅच्युसेट येथे प्रत्येकी पावणेदोन लाख चाचण्या करण्यात आल्या आहेत. मॅसॅच्युसेट्स, पेनसिल्वानिया, लुझियाना, इलिनॉय आणि वॉशिंग्टनमधे सव्वालाख ते १ लाख ६० हजारदरम्यान नागरिकांच्या चाचण्या घेण्यात आल्या असल्याची माहिती प्रसिद्ध जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या कोरोना व्हायरस रिसोर्स सेंटरने प्रसिद्ध केली आहे.न्यूयॉर्कमध्ये ५५000 रुग्ण हॉस्पिटलमध्येन्यूयॉर्कमधील रुग्णालयांमधे सोमवारी दुपारपर्यंत तब्बल ५५ हजार ७२३ नागरिकांवर उपचार सुरू होते. पाठोपाठ न्यूजर्सी ७४९४, कॅलिफोर्निया ४,९३६, इलिनॉयमधे ४ हजार ३१४ रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जॉन हॉपकिन्स विद्यापीठाचे म्हणणे आहे.अमेरिकेतील प्रमुख राज्यांची कोरोना चाचणीची शनिवारपर्यंतची आकडेवारीन्यूयॉर्क ६,१७,५५५कॅलिफोर्निया २,८०,९००फ्लोरिडा २,६०,७२४टेक्सास १,८२,७१०न्यू जर्सी १,७०,६८८मॅसॅच्युसेट १,६२,२४१पेनसिल्वानिया १,५८,८५४लुझियाना १,४१,५०४वॉशिंग्टन १,३५,७०६इलिनॉय १,४३,३१८मिशिगन १,०९,०००

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका