शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus News: आता सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क अनिवार्य होणार; युरोपातील 2 मोठे देश महत्त्वपूर्ण निर्णय घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 20:48 IST

कोरोनाची दुसरी लाट टाळण्यासाठी दोन देशांचे प्रयत्न सुरू

लंडन/पॅरिस: कोरोनाचा कहर झेललेल्या युरोपातील दोन प्रमुख देशांमध्ये आता सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक करण्यात येणार आहे. फ्रान्समध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी कोरोना रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर फ्रान्सनं हा निर्णय घेतला. याची घोषणा अध्यक्ष इमॅन्युल मॅक्रॉन यांनी केली. त्याआधी इंग्लंडनं अशाच प्रकारचा निर्णय घेतला. २४ जुलैपासून इंग्लंडमधील दुकानं आणि सुपरमार्केट्समध्ये मास्क घालणं बंधनकारक असेल. मास्क न घातल्यास १०० पाऊंडचा दंड ठोठावण्यात येईल.इंग्लंडनं कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज राहावं, असा धोक्याचा इशारा वैद्यकीय विज्ञान अकादमीनं दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर इंग्लंड सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत. इंग्लंडमध्ये येणारी कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा जास्त धोकादायक असल्याचा इशारा देण्यात आल्यानं चिंता वाढली आहे. त्यामुळे आता सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क बंधनकारक करण्याचा निर्णय इंग्लंड सरकारनं घेतला आहे. इंग्लंड आणि फ्रान्सच्या आधी स्पेन, इटली आणि जर्मनी या युरोपातल्या इतर महत्त्वाच्या देशांनीदेखील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फेस मास्क अनिवार्य केला आहे. यानंतर आता इंग्लंडनं कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन सर्तकेतेचा उपाय म्हणून नागरिकांसाठी फेस मास्क बंधनकारक केला आहे. चीनच्या वुहाननंतर कोरोनानं युरोपमध्ये थैमान घातलं. इटलीला कोरोनाचा मोठा फटका बसला. इंग्लंड आणि फ्रान्समध्येही कोरोनामुळे परिस्थिती बिकट झाली होती. फ्रान्समध्ये कोरोनाचे १ लाख ७२ हजार ३७७ रुग्ण आढळून आले. यापैकी ३० हजार जणांचा मृत्यू झाला. तर इंग्लंडमध्ये २ लाख ९० हजार १३३ जणांना कोरोनाची लागण झाली. यापैकी ४४ हजार ८३० जण मृत्यूमुखी पडले. इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFranceफ्रान्सEnglandइंग्लंड