शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : इंग्लंडमध्ये 'डेल्टा'चा परिणाम; लॉकडाऊन असूनही दैनंदीन कोरोना रुग्ण संख्येत एका आठवड्यात 49% वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 10:00 IST

गेल्या गुरुवारच्या आकडेवारीचा विचार करता या संख्येत तब्बल 49 टक्क्यांनी वाढ झाली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे सध्या इग्लंडमध्ये कडक लॉकडाऊन सुरू आहे.

 लंडन - इंग्लंडमध्ये आजही कोरोनाचा कहर सुरूच आहे. सातत्याने लॉकडाऊन असूनही येथे मार्चनंतर पहिल्यांदाच दैनंदिन कोरोना रुग्ण संख्या एका आठवड्यात 49 टक्यांनी वाढून 5000 वर पोहोचली आहे. तर 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिलासादायक गोष्ट म्हणजे इंग्लंडमध्ये जवळपास अर्ध्या वयस्क नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. 

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येथे बुधवारी 5,274 नवे कोरोनाबाधित आढळून आले. 26 मार्चनंतरची ही एका दिवसातील सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. गेल्या गुरुवारच्या आकडेवारीचा विचार करता या संख्येत तब्बल 49 टक्क्यांनी वाढ झाली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे सध्या इग्लंडमध्ये कडक लॉकडाऊन सुरू आहे. कोरोनामुळे बुधवारी झालेले मृत्यू, हे गेल्या आठवड्याच्या तुलनेत 80 टक्के अधिक आहेत. गेल्या आठवड्यात ही संख्या 10 होती. मात्र, ही संख्या बँकांची सुट्टी आणि रिपोर्टिंगमध्ये झालेला उशीर यामुळे अधिक असू शकते.

CoronaVirus: नेपाळी कोरोना स्ट्रेनने युरोपची झोप उडविली, लसही बेकार; WHO म्हणतेय...

अत्यंत संक्रमक असलेल्या डेल्टाचा परिणाम -इंग्लंड सरकारने म्हटले आहे, की अत्यंत संक्रमक असलेल्या डेल्टामुळे रुग्ण संख्येत वाढ होत आहे. विशेष म्हणजे, चार नव्या रुग्णांपैकी तीनहून अधिक रुग्णांसाठी डेल्टा जबाबदार आहे. सरकारकडून सांगण्यात आले आहे, की साधारणपणे सहामहिन्यांपूर्वी लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर आतापर्यंत 2,64,22,303 जणांना दुसरा डोसही देण्यात आला आहे. हे प्रमाण 18 वर्ष आणि त्याहून अधिक वय असलेल्या सर्व नागरिकांचा विचार करता, 50.2 टक्क्यांपर्यंत आहे. विशेष म्हणजे, यथे जवळपास 75.5 टक्के वयस्क लोकांना लशीचा पहिला डोस मिळाला आहे.

ब्रिटनमध्ये साकारताेय थक्क करणारा ‘ब्लू ॲबिस’; जगातील सर्वांत माेठा जलतरण तलाव

येजनेनुसार, 21 जूनला येथील लॉकडाउन संपवण्यात येणार होता. मात्र, आता ती परवानगी दिली जाईल की नाही, यावर येथील मंत्र्यांनी अद्याप कसल्याही प्रकारचे भाष्य केलेले नाही. मात्र, आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी म्हटल्याप्रमाणे, एक 'चांगला संकेत' म्हणजे, रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांत लस घेतलेल्यांचे प्रमाण अत्यंत कमी आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEnglandइंग्लंडCorona vaccineकोरोनाची लस