शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कोरोनासाठी प्रभावी औषधाचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2020 06:58 IST

Coronavirus : ट्रम्प यांनी म्हटले आहे की, औषधांच्या इतिहासात हा निर्णायक टप्पा ठरणार आहे. एफडीएने मोठे शिखर गाठले आहे. धन्यवाद.

वॉशिंग्टन : हायड्रोक्झिक्लोरोक्विन आणि अ‍ॅझिथ्रोमायसीन यांचे एकत्रीकरण हे औषधींच्या इतिहासातील सर्वात मोेठे गेम चेंजर ठरणार आहे, असे ट्विट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या ट्विटनंतर यावर अनेक नकारात्मक प्रतिक्रियाही अनेकांनी ट्विट केल्या आहेत. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, औषधांच्या इतिहासात हा निर्णायक टप्पा ठरणार आहे. एफडीएने मोठे शिखर गाठले आहे. धन्यवाद. मात्र, यावर अनेकांनी ट्रम्प यांचा दावा खोडून काढला आहे. यूजीन गू या एका एमडी डॉक्टरांनी यावर टष्ट्वीट करत म्हटले आहे की, कोरोनावरील उपचारासाठी या दोन औषधांचे मिश्रण सुरक्षित असल्याचे सिद्ध झालेले नाही. याबाबत विदेशातून एका प्रकरणाचे वृत्त आले आहे. चमत्कारिक औषधाचा दावा हा खोटी आशा आहे. मला हे ठाउक आहे की, सध्या इमर्जन्सी आहे आणि आम्ही सर्व निराश आहोत. पण, एक डॉक्टर या नात्याने मी एवढेच सांगेन की, मानवी रुग्णांवर असे परीक्षण करायला नको. ज्यामुळे दृष्टी, हृदयाला हानी पोहचू शकते. यात गुंतागुंत होऊन मृत्यूसारखे दुष्प्रभावही होऊ शकतात.अनेक नागरिकांनी ट्विटरवर ट्रम्प यांचे आभार मानले असले तरी बऱ्याच लोकांनी नकारात्मक प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. अमेरिकेतील राजकीय टीकाकार एडवर्थ हार्डी यांनी म्हटले आहे की, या दोन औषधांचे मिश्रण सुरक्षित असल्याचे अनेक परिक्षणातून सिद्ध झालेले नाही. आपण अमेरिकन नागरिकांची दिशाभूल करत आहात. ट्रम्प हे अतिशय धोकादायक चुकीच्या सूचनेचा प्रसार करत आहेत आणि संकट आणखी गडद करत असल्याची टीकाही सोशल मीडियातून होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प