देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. भारत सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांत संपूर्ण जगात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढली आहे. बऱ्याचशा देशांनी लॉकडाऊन हटवल्यानं कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचा दावा केला जात आहे. याचाच संदर्भ देत 'माणसानं १९१८ मध्ये केलेल्या चुकीची पुनरावृत्ती करू नये', अशी एक फेसबुक पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे. हजारो जणांनी ती शेअर केली आहे. '१९१८ मध्ये जगात स्पॅनिश फ्लू नावाची महामारी आली होती. जवळपास दोन वर्षे स्पॅनिश फ्लूचा परिणाम पाहायला मिळाला. ५० कोटी लोकांना स्पॅनिश फ्लूची लागण झाली होती, तर ५ कोटी लोकांनी यामुळे जीव गमावला होता. यातील बहुतांश जणांचा बळी स्पॅनिश फ्लूच्या दुसऱ्या टप्प्यात गेला. त्यावेळी लोक क्वारंटिन आणि सोशल डिस्टन्सिंगला इतके कंटाळले होते की निर्बंध शिथिल होताच ते मोठ्या संख्येनं रस्त्यावर आले. त्यानंतर काही आठवड्यांत स्पॅनिश फ्लूची पुन्हा लागण होऊ लागली. त्यात काही कोटी नागरिकांचा बळी गेला,' अशा आशयाची पोस्ट सध्या फेसबुकवर व्हायरल झाली आहे.
CoronaVirus News: अनलॉक-1 मुळे होऊ शकते 1918 ची 'जीवघेणी' पुनरावृत्ती?; जाणून घ्या त्या मेसेजमध्ये तथ्य किती
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 17:00 IST
लॉकडाऊन हटवल्यामुळे १९१८ मध्ये घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होण्याचा दावा
CoronaVirus News: अनलॉक-1 मुळे होऊ शकते 1918 ची 'जीवघेणी' पुनरावृत्ती?; जाणून घ्या त्या मेसेजमध्ये तथ्य किती
ठळक मुद्दे१९१८ मध्ये आलेल्या स्पॅनिश फ्लूचा व्हायरल फेसबुक पोस्टमध्ये उल्लेखक्वारंटिन, सोशल डिस्टन्सिंगचे निर्बंध हटवल्यानं अनर्थ घडल्याचा उल्लेखइतिहासाची पुनरावृत्ती टाळण्याचं फेसबुक पोस्टमधून आवाहन