शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: बाजारात सहज मिळणारं 'ते' औषध ठरणार गुणकारी; कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण होणार कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 06:59 IST

सहज उपलब्ध असलेले स्टेरॉईड गुणकारी

पॅरिस : बाजारात सहजपणे उपलब्ध असलेले ‘डेक्झामेथॅसोन’ हे स्टेरॉइड ‘कोविड-१९’ने गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना दिल्यास मृत्यूचे प्रमाण एक तृतियांशाने कमी होते, असा निष्कर्ष ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी अभ्यास पाहणीतून काढला आहे. जगभर हाहाकार माजविलेल्या कोरोना महामारीच्या विरोधातील लढ्यात ही मोठी आशादायी बाब मानली जात आहे.‘कोरोनाने गंभीर आजारी असलेल्या दोन हजार रुग्णांना हे स्टेरॉइड देऊन केलेल्या या अभ्यास पाहणीचा निष्कर्ष मंगळवारी जाहीर करण्यात आला. ज्यांना हे औषध दिले नाही अशा चार हजार रुग्णांचाही या चाचणीत तौलनिक अभ्यासासाठी समावेश करण्यात आला होता. त्यात आढळले की, ज्यांना श्वासही घेता येत नाही म्हणून व्हेंटिलेटरवर ठेवले गेले होते, अशा कोरोना रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण ३५ टक्क्यांनी कमी झाले. ज्यांना आॅक्सिजन दिला जात होता, अशा रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण २० टक्क्यांनी कमी झाले.या वैज्ञानिकांचे नेतृत्व ऑक्सफर्ड विद्यापीठातील न्यूफिल्ड डिपार्टमेंट ऑफ मेडिसिनमधील साथीच्या रोगांविषयीचे प्रा. डॉ. पीटर हॉर्बी यांनी केले. ते म्हणाले की, यामुळे कोरोना रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकते असे ‘डेक्झामेथॅसोन’ हे पहिले औषध आहे. हा नवा शोध खूपच स्वागतार्ह आहे. हे स्टेरॉइड तुलनेने स्वस्त व औषधांच्या दुकानांमध्ये सहजपणे उपलब्ध होणारे असल्याने कोविड रुग्णांचे मृत्यू टाळण्यासाठी त्याचा जगभर लगेच सहज वापर सुरू करता येईल. (वृत्तसंस्था)वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार ‘व्हेंटिलेटर’वर असलेल्या कोरोना रुग्णांना दररोज ‘डेक्झामेथॅसोन’ हे स्टेरॉइड दिल्यास आठपैकी एका रुग्णाचा मृत्यू टाळता येतो, तर ज्यांना फक्त आॅक्सिजन दिला जात आहे अशा २५ पैकी एका रुग्णाचा जीव वाचविला जाऊ शकतो.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या