शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोना व्हायरसबाबत महत्त्वाची माहिती समोर; WHO च्या प्रमुखांनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 21:21 IST

३० जानेवारी २०२० रोजी भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून भारतात कोरोनाचे सुमारे साडेचार कोटी रुग्ण समोर आले आहेत.

नवी दिल्ली - गेल्या ३ वर्षापासून जगभरात कोविड महामारीचं संकट उभं राहिले आहे. या महामारीच्या जाळ्यात अनेक जण अडकले. कोविड-१९ मुळे गेल्या आठ आठवड्यात १.७० लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. हे असे आकडे आहेत ज्यांचे अहवाल समोर आले आहेत. खरी संख्या यापेक्षा कितीतरी जास्त असेल हे आम्हाला माहीत आहे असं विधान जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी केले आहे. त्याचसोबत कोरोना महामारी कधी संपणार नाही असा इशाराही WHO नं दिला आहे. 

WHO च्या इंटरनॅशनल हेल्थ रेग्युलेशन इमर्जन्सी कमिटीने म्हटलं आहे की, जगातून कोरोना व्हायरस मनुष्य आणि प्राण्यांपासून दूर करणे जवळजवळ अशक्य आहे. केवळ आपण त्याचे भयंकर परिणाम कमी करू शकतो. लोकांचे मृत्यू कमी करू शकतात. लोकांना त्याचा संसर्ग होण्यापासून वाचवू शकतो. परंतु ही महामारी जागतिक आरोग्य आणीबाणी कायम राहील.

जगभरातील आरोग्य यंत्रणा कोविड-१९ शी झुंज देत आहेत. त्यामुळे इतर मोठ्या आजारांकडेही लक्ष देणे कठीण होत आहे. कारण कोविडला अजूनही प्रामुख्याने घेतले जात आहे. कोविड-१९ महामारीमुळे संपूर्ण जगाची आरोग्य व्यवस्था ढासळली आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता भासू लागली आहे असंही कमिटीनं म्हटलं. 

दरम्यान, कोरोना व्हायरसला(Corona Virus) कमी लेखणे ही एक मोठी चूक असू शकते. तो आपल्याला कायम सरप्राइज करेल. तो आपल्याला मारण्याचा प्रयत्न करत राहील. म्हणूनच आपल्याला अधिक वैद्यकीय साधने आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांची गरज आहे. हा विषाणू आपल्या माणसांमध्ये आणि प्राण्यांमध्ये स्थिरावला आहे. आता अनेक पिढ्या संपणार नाहीत. म्हणूनच सर्वात मोठी गरज आहे ती योग्य लस आणि अधिक लसीकरणाची. जेणेकरून लोकांना रोगप्रतिकारक शक्ती दिली जाऊ शकते असं टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी सांगितले. 

भारतात काय परिस्थिती?३० जानेवारी २०२० रोजी भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून भारतात कोरोनाचे सुमारे साडेचार कोटी रुग्ण समोर आले आहेत. चांगली गोष्ट म्हणजे जवळपास ९९ टक्के लोकही कोरोनामधून बरे झाले आहेत. भारतात तीन वर्षांत कोरोनाच्या तीन लाटा आल्या. पहिली लाट घाबरवलं, दुसर्‍याने लाटेनं रडवलं आणि तिसर्‍याने बऱ्यापैकी सांभाळलं 

टॅग्स :World health organisationजागतिक आरोग्य संघटनाcorona virusकोरोना वायरस बातम्या