शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine: कोरोना लसीकरणानंतर काही महिन्यातच अँन्टिबॉडीमध्ये होतेय घट?; रिपोर्टमध्ये धक्कादायक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 18:48 IST

लसीकरण आजही कोरोनासारख्या गंभीर आजाराविरोधात विशेषत: डेल्टा व्हेरिएंटविरुद्ध सुरक्षा देत आहेत.

ठळक मुद्देभारतात ऑक्सफोर्ड एस्ट्राजेनेका कोविशील्डच्या नावानं लोकांना दिली जाते. हिवाळ्यापर्यंत वृद्ध आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी अँन्टीबॉडीज ५० टक्क्यांच्या खाली येऊ शकतातपुढील महिन्यापासून ब्रिटनमधील लोकांना बूस्टर डोस देण्याची शक्यता आहे

लंडन – कोविड १९ विरुद्ध फायजर, बायाटेक आणि ऑक्सफोर्ड एस्ट्राजेनेका लसीकरणाच्या दोन्ही डोसनंतर मिळालेली सुरक्षा कालांतराने घटत असल्याचं समोर आले आहे. बुधवारी ब्रिटनमध्ये जारी केलेल्या रिपोर्टनुसार, फायजर, बायोटेकच्या दोन्ही डोसनंतर शरीरात तयार झालेल्या अँन्टिबॉडीज ५ महिन्यात ८८ टक्क्यावरुन सहाव्या महिन्यात ७४ टक्के शिल्लक राहत आहेत.

भारतात कोविशील्डच्या अँन्टिबॉडीजमध्ये घट

भारतात ऑक्सफोर्ड एस्ट्राजेनेका कोविशील्डच्या नावानं लोकांना दिली जाते. ही लस घेणाऱ्यांमध्ये ४ महिन्यानंतर अँन्टिबॉडीज ७७ टक्क्याहून पाचव्या महिन्यात ६७ टक्के शिल्लक राहतात. रिपोर्टच्या या निष्कर्षावरुन ब्रिटनमधील सरकारनं सर्वाधिक धोका असलेल्या वयोगटातील लोकांना बूस्टर डोस देण्याची शिफारस केली आहे. पुढील महिन्यापासून ब्रिटनमधील लोकांना बूस्टर डोस देण्याची शक्यता आहे. जो कोविड स्टडीचे मुख्य वैज्ञानिक प्रोफेसर टीम स्पेक्टर म्हणाले की, "माझ्या मते, तार्किकदृष्ट्या सर्वात वाईट परिस्थिती हिवाळ्यापर्यंत वृद्ध आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी अँन्टीबॉडीज ५० टक्क्यांच्या खाली येऊ शकतात असं त्यांनी सांगितले आहे.

डोस उशीरा घेण्याचं कुठलंही कारण नाही

परंतु प्रोफेसर यावर जास्त भर देत आहेत की, लसीकरण आजही कोरोनासारख्या गंभीर आजाराविरोधात विशेषत: डेल्टा व्हेरिएंटविरुद्ध सुरक्षा देत आहेत. लसीकरणानंतर मिळणारी अँन्टीबॉडीजमध्ये काही प्रमाणात घट होते परंतु लस न घेण्याचं कुठलंही कारण नाही. लसीकरण आजही डेल्टासह अन्य व्हेरिएंट्सवर सर्वाधिक सुरक्षा देतात. त्यामुळे आपल्याला जितकं शक्य आहे तितक्या जास्त प्रमाणात लोकांचे लसीकरण करणे गरजेचे आहे. त्याचसोबत बूस्टर डोसबाबत योजना आखणं महत्त्वाचं आहे. तसेच लहान मुलांचे लसीकरण करण्याची रणनीती आणि मृत्यूचं प्रमाण रोखण्यापर्यंत ही मोहीम सुरुच ठेवावी लागेल असंही ते म्हणाले.

डेल्टा व्हेरिअंट विरोधात फायजर, मॉडर्ना लसींचा प्रभाव कमी

अमेरिकी आरोग्य कार्यकर्त्यांनी प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार फायजर आणि मॉडर्ना लसी कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटविरोधात कमी प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. यात दोन्ही लसींची प्रभावी क्षमता ९१ टक्क्यांवरुन घसरुन थेट ६६ टक्क्यांवर आली आहे. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनकडून (सीडीसी) या दोन लसीच्या वास्तविक स्वरुपात मानवी शरीरावर होत दिसून येत असलेल्या प्रभावाची चाचणी केली जात आहे. याच दोन लसींना सर्वात आधी फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनद्वारे अधिकृत मान्यता देण्यात आली होती. त्यामुळे या दोन लसींचा डेल्टा व्हेरिअंटविरोधातील प्रभावी क्षमतेची चाचणी केली जात आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या