बीजिंग: कोरोना व्हायरस जगभरात पसरलेला असून, आतापर्यंत बरेच देश त्याच्या विळख्यात सापडले आहेत. चीन आणि युरोपनंतर अमेरिकेमध्ये या व्हायरसनं थैमान घातलं असून, दिवसागणिक कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच चालली आहे. या विषाणूच्या संसर्गाची सुरुवात वुहानमधील पशु-पक्ष्यांच्या बाजारातून झाल्याचं समजलं जातं. दुसरीकडे अमेरिकेसह बर्याच देशांनी वुहानच्या प्रयोगशाळेत हा व्हायरस तयार करण्यात आल्याचा दावा केला आहे. अमेरिका आणि चीनमध्ये या व्हायरसवरून आरोप-प्रत्यारोप होऊ लागले असून, त्याचदरम्यान जिनं कोरोनाच्या पहिल्या रुग्णावर उपचार करणारी डॉक्टर समोर आली आहे. चिनी सरकारी माध्यमांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये वुहानमधील एका वृद्ध महिलेमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता. ही महिला प्रथम झांग जिक्सियन नावाच्या एका महिला डॉक्टरांकडे उपचारासाठी गेली, तिथे तिचे सिटी स्कॅन केले. चीनचा असा दावा आहे की, ही पहिली महिला डॉक्टर आहे, जिनं पहिल्यांदाच या विषाणूबद्दल प्रशासनाला इशारा दिला. वुहान प्रशासनानेही या योगदानाबद्दल डॉक्टरांचे कौतुक केले आहे.श्वसन विकारावर उपचार करतात झांग वुहानमध्ये श्वसन विकारावर उपचार करणाऱ्या डॉक्टर झांग सांगतात, 26 डिसेंबर रोजी वुहानच्या परिसरातील एक वयोवृद्ध दाम्पत्य हुबई प्रांतीय रुग्णालयात पोहोचलं होतं. महिलेची तपासणी केली गेली असता या व्हायरससंबंधी माहिती समोर आली. परंतु त्यावेळी आम्हाला माहीत नव्हते की, हे इतके भयंकर संकट असेल. रुग्णालयाच्या श्वसन विकार विभागाच्या संचालक असलेल्या झांग यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, या वृद्ध दाम्पत्याला फ्लू किंवा न्यूमोनियासारखे दिसणारे ताप, खोकला आणि थकवा अशी लक्षणे आढळली.अधिकृत वार्ता समिती शिन्हुआच्या म्हणण्यानुसार, परंतु जेव्हा दुसर्याच दिवशी सिटी स्कॅन करण्यासाठी 54 वर्षीय आला, तेव्हा झांग यांना त्याच्यात फ्लू किंवा सामान्य निमोनियापेक्षा काहीतरी वेगळी लक्षणं दिसली. २००३मध्ये आलेल्या सार्स साथीसारखाच हा प्रकार असल्याची कल्पना झांग यांना आली. वृद्ध दाम्पत्याचे सिटी स्कॅन पाहिल्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलाला बोलावून घेतले, तसेच त्यालासुद्धा सीटी स्कॅन करण्यास सांगितले.सीटी स्कॅनसाठी मुलगा तयार नव्हताझांग म्हणाल्या की, त्याच्या पहिल्या मुलाने चाचणी घेण्यास नकार दिला होता. त्याला कोणतीही लक्षणे किंवा समस्या नव्हती आणि त्याला वाटले की, मी त्याच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु झांगच्या दबावाखाली येत त्याने चाचणी केली आणि आणखी एक पुरावा समोर आला. आईवडिलांप्रमाणेच त्या मुलाच्या फुफ्फुसातही असामान्य हालचाली होत्या. झांग यांनी शिन्हुआला सांगितले की, "संसर्गजन्य आजार असल्याशिवाय एकाच कुटुंबातील तीन सदस्यांना एकाच वेळी समान आजार होणार नाही.दुसर्या दिवशी 27 डिसेंबरला, दुसरा रुग्ण रुग्णालयात आला आणि त्यालाही अशी लक्षणे दिसू लागली. चारही जणांच्या रक्त चाचण्यांद्वारे व्हायरल इन्फेक्शन असल्याचे आढळून आले. झांगबरोबर त्याने अनेक इन्फ्लूएंझा संबंधित चाचण्या घेतल्या, परंतु त्याच्या निकालातून काहीही निष्पन्न झाले नाही. त्यानंतर झांगने रुग्णालयात अहवाल सादर केला आणि तो रोग नियंत्रण व प्रतिबंधक जिल्हास्तरीय केंद्राकडे सोपविण्यात आला. रिपोर्टमध्ये म्हटलं होतं की, "आम्हाला एक विषाणूजन्य आजार सापडला असून, हा कदाचित संसर्गजन्य आहे.
Coronavirus : वुहानमध्ये कोरोनाच्या पहिल्या रुग्णावर उपचार करणारी डॉक्टर आली समोर; केला मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 11:22 IST