शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

coronavirus: चारपैकी एका मधुमेही व्यक्तीला कोरोनाचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 04:16 IST

पण कोरोनाचा व्हायरस नेमका कोणावर मोठ्या प्रमाणात आक्रमण करतो आणि कोण अधिक संख्येनं त्याला बळी पडतात, याचा शोध घेण्याचा प्रयत्न अजूनही सुरूच आहे. कारण अशा लोकांना प्रथम संरक्षण दिलं तर ते वाचू शकतील हा त्यामगचा कयास.

इंग्लंड -  काहीही केलं, कितीही काळजी घेतली, कोरोनाला प्रतिबंध करायचा प्रयत्न केला, तरी कोरोना जगातून पूर्णपणे कधीच संपणार नाही. छोट्या प्रमाणात का होईना, कुठे ना कुठे तो अस्तित्वात राहीलच, असा इशारा खुद्द जागतिक आरोग्य संघटनेने दिलेला असताना कोरोनाचे संकट आणखी गहिरं झाले आहे.पण कोरोनाचा व्हायरस नेमका कोणावर मोठ्या प्रमाणात आक्रमण करतो आणि कोण अधिक संख्येनं त्याला बळी पडतात, याचा शोध घेण्याचा प्रयत्न अजूनही सुरूच आहे. कारण अशा लोकांना प्रथम संरक्षण दिलं तर ते वाचू शकतील हा त्यामगचा कयास.इंग्लंडमधील डॉक्टर आणि संशोधकांनी नुकत्याच केलेल्या अभ्यासात त्यांना आढळून आलं आहे की, ज्यांना मधुमेह, म्हणजे डायबेटिसचा आजार आहे, अशा लोकांना कोेरोनाची लागण होण्याचा धोका सगळ्यात जास्त आहे. यासंदर्भात स्वत:च्या देशातील रुग्णांची आणि कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या केसेस तपासल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या दर चार रुग्णांपैकी एक रुग्ण डायबेटिसचा पेशंट होता.यासाठी ३१ मार्च ते १२ मे या काळात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या २२,३३२ लोकांचा केसस्टडी त्यांनी केला. त्यावेळी संशोधकांना लक्षात आलं की, त्यातील ५,८७३ म्हणजे तब्बल २६ टक्के नागरिक डायबेटिसचे पहिल्या किंवा दुसऱ्या स्तरावरचे रुग्ण होते. इंग्लंडच्या इंटेन्सिव्ह केअर नॅशनल आॅडिट अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरनं याबाबतचा अभ्यास केला.त्यांच्या अभ्यासानुसार, डायबेटिसच्या रुग्णांना कोरोनाचा धोका सर्वांत जास्त आहे. त्याचबरोबर आणखी कोणत्या आजाराच्या रुग्णांना कोरोनाची भीती आहे, ती आकडेवारीही त्यांनी जाहीर केली. त्यानुसार डिमेन्शिया, मेंदूचा आजार, स्मृतिभ्रंश असणाºया नागरिकांना कोरोनाचा धोका १८ टक्के, श्वासोच्छ्वास, दम्याचा विकार असणाऱ्यांना १५ टक्के, किडनीचा जुनाट आजार असणाºयांना १४ टक्के, तर हृदयविकार असणाºयांना हा धोकादहा टक्के असल्याचंही शास्त्रज्ञांना निरीक्षणातून आढळून आलं आहे. यासंदर्भात अजूनही संशोधन सुरू आहे. त्यानुसार आणखी अचूक माहिती हाती येईल, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. या आजाराच्या रुग्णांनी स्वत:ची अधिक काळजी घ्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याInternationalआंतरराष्ट्रीयHealthआरोग्य