शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: कोरोनाग्रस्त रुग्णांवर भलतंच संकट; शरीरात रक्त गोठत असल्यानं डॉक्टरसुद्धा झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 21:47 IST

व्हायरसमुळे कोरोना रुग्णांच्या मूत्रपिंडातही रक्त जमा होत आहे. अशा रुग्णांना हृदयविकाराचा धोका आहे.

न्यूयॉर्क: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, अनेक नवी माहिती समोर येऊ लागली आहे. कोरोनाग्रस्तांच्या शरीरात रक्त गोठत असल्याची नवीच माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील माऊंट सिनाई हॉस्पिटलमधील नेफरोलॉजिस्टना असे आढळले आहे की, व्हायरसमुळे कोरोना रुग्णांच्या मूत्रपिंडातही रक्त जमा होत आहे. अशा रुग्णांना हृदयविकाराचा धोका आहे. तसेच कोरोनाग्रस्त रुग्णांना हृदयविकार येणाऱ्या घटनांमध्येही वाढ झाली आहे.माउंट सिनाई हॉस्पिटलचे डॉक्टर जे. पी. मोक्कोनी सांगितले की, हा रोग रक्त कसे गोठवतो हे आश्चर्यचकीत करणारे आहे. अनेक कोरोनाग्रस्त तरुणांना हृदयविकाराचा झटका आल्याचे प्रकार समोर आले आहेत. मार्चच्याच तीन आठवड्यांत डॉक्टर मोक्को यांनी मेंदूत रक्तपुरवठ्याला अडथळा निर्माण होऊन हृदयविकाराचा झटका आलेले 32 रुग्ण पाहिल्याचं डॉक्टर जे. पी. मोक्कोंनी सांगितलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, 32पैकी निम्म्या रुग्णांना कोरोना विषाणूची लागण झाली होती.दुसरीकडे विलगीकरण कक्षात राहून बरं झालेल्या रुग्णाला 70 दिवसांनी कोरोनाची पुन्हा लागण झाली आहे. त्यामुळे चीनमध्ये चिंता वाढली आहे. एकेकाळी कोरोनाचे केंद्रबिंदू असलेल्या वुहानमध्ये एका 50 वर्षाच्या माणसाला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला होता. त्याच्यात कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यावर त्याला सुरुवातीला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. दोन वेगवेगळ्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर तो बरा झाला असून, त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. विशेष म्हणजे त्या व्यक्तीला पुन्हा कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचा संशय आला, तेव्हा त्यानं चाचणी केली असता तो पॉझिटिव्ह आढळला. या व्यक्तीला कोरोना संसर्गातून बरे होऊन दोन महिने उलटले आहेत. चीनमध्ये अशा प्रकारची बरीच प्रकरणे समोर आली आहेत. बऱ्याच रुग्णांमध्ये लक्षणं दिसत नाहीत, तर काही रुग्ण 50 किंवा 60 दिवसांनी पुन्हा कोरोनाग्रस्त झाल्याचंही आढळलं आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या