शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

coronavirus: लॅबमधून नव्हे, तर प्राण्यांमधून कोरोनाचा संसर्ग, जागतिक आरोग्य संघटनेच्या निष्कर्षातून चीनला क्लीन चिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 06:52 IST

Coronavirus News : गेल्या वर्षी या विषाणूचा संसर्ग झाला. मात्र, तो वुहानमधील चीनच्या प्रयोगशाळेतून किंवा तेथील गळतीतून झालेला नाही, असा निर्वाळा आरोग्य संघटनेने तेथील पाहणी, चीनने सादर केलेले पुरावे आणि तेथील परिस्थितीजन्य माहितीनंतर दिला आहे

बीजिंग : चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतून नव्हे, तर वटवाघळे किंवा प्राण्यांच्या गोठवलेल्या मांसातून  कोरोना पसरल्याच्या शक्यतेवर जागतिक आरोग्य  संघटनेने आपल्या अहवालात शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे जगभर हा विषाणू पसरवल्याच्या आरोपातून चीनला जवळपास  क्लीन चिट मिळाल्याचे मानले जाते. हा अहवाल लवकरच अधिकृतपणे जाहीर केला जाणार आहे. गेल्या वर्षी या विषाणूचा संसर्ग झाला. मात्र, तो वुहानमधील चीनच्या प्रयोगशाळेतून किंवा तेथील गळतीतून झालेला नाही, असा निर्वाळा आरोग्य संघटनेने तेथील पाहणी, चीनने सादर केलेले पुरावे आणि तेथील परिस्थितीजन्य माहितीनंतर दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने चीनसोबत संयुक्त अभ्यास करून हे संशोधन केले आहे. मात्र, हा प्रसार चीनमध्येच का झाला, अन्य देशांतील वटवाघळे किंवा प्राण्यांतून का नाही, याचे उत्तर या अहवालात नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे अहवाल जाहीर झाल्यानंतर चीनला क्लीन चिट मिळेल, परंतु हा संसर्ग कसा झाला त्याचे ठोस उत्तर मिळण्याची शक्यता जवळपास कमी आहे.या अभ्यास गटाने विषाणूच्या प्रयोगशाळेतील गळतीचे गृहीतक वगळून विषाणूच्या प्रसाराबाबतच्या अन्य शक्यतांवरच संशोधन केल्याचे वृत्तसंस्थेच्या हाती आलेल्या अहवालातून दिसते. या अहवालाच्या प्रकाशनास वारंवार विलंब झाला आहे. आता मात्र तो लवकरच प्रसारित होईल, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. हा अहवाल मुख्यत्वे जानेवारीच्या मध्यापासून फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत वुहानला आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी दिलेल्या भेटीवर आधारित आहे. वुहान मोहिमेचे नेतृत्व करणारे जागतिक आरोग्य संघटनेचे तज्ज्ञ पीटर बेन एम्बारेक यांनी सांगितले की, या अहवालाला अंतिम स्वरूप आले असून, त्याची सत्यता पडताळणी आणि भाषांतर केले जात आहे. येत्या काही दिवसांत ती प्रक्रिया पूर्ण होईल आणि आम्ही हा अहवाल जाहीर करू, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था) 

खवले मांजरातही सापडला विषाणू    यापूर्वी प्राण्यांमधून पसरलेल्या सार्सनंतर कोरोनाचे विषाणू तयार होण्यास प्रदीर्घ काळ लागला असून, त्याच्या उत्क्रांतीचा प्रवासही यात मांडण्यात आला आहे.  हे अंतर कित्येक दशकांचे असावे, असा अंदाज अहवालात आहे. अशाच प्रकारचे विषाणू खवले मांजरातही आढळले आहेत. मांजरीमुळेही कोविडची लागण होण्याची शक्यता मांडण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना