coronavirus: कोरोनामुळे समुद्रातील जैवसाखळीला सुखाचे दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 04:24 AM2020-05-14T04:24:57+5:302020-05-14T04:27:23+5:30

संयुक्त राष्ट्रांतील आशिया, पॅसिफिक भागासाठीच्या आर्थिक व सामाजिक बाबींविषयक समितीने (इस्कॅप) आपल्या अहवालात हे निरीक्षण नोंदविले आहे. या समितीने म्हटले आहे की, कोरोनाच्या साथीमुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे मासेमारी मोठ्या प्रमाणावर कमी झाली.

coronavirus: Coronavirus happy days for marine life | coronavirus: कोरोनामुळे समुद्रातील जैवसाखळीला सुखाचे दिवस

coronavirus: कोरोनामुळे समुद्रातील जैवसाखळीला सुखाचे दिवस

Next

जिनिव्हा : कोरोना साथीपायी लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे हवेतील प्रदूषण कमी होण्याबरोबरच आता सागरी प्रदूषणातही मोठी घट झाली आहे. जगभरात औद्योगिक उत्पादन, जहाजांची वाहतूक, मासेमारी थंडावल्यामुळे हा परिणाम साधला गेला आहे. आतापर्यंत प्रदूषणामुळे समुद्राच्या जैवसाखळीचे झालेले नुकसान भरून येण्यास लॉकडाऊनमुळे मदतच होत आहे.
संयुक्त राष्ट्रांतील आशिया, पॅसिफिक भागासाठीच्या आर्थिक व सामाजिक बाबींविषयक समितीने (इस्कॅप) आपल्या अहवालात हे निरीक्षण नोंदविले आहे. या समितीने म्हटले आहे की, कोरोनाच्या साथीमुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे मासेमारी मोठ्या प्रमाणावर कमी झाली. सध्या सर्व बंदरे बंद आहेत. जगभरात बहुतांश हॉटेल, रेस्टॉरंटही बंद असल्यामुळे माशांना असणारी मागणी खूपच कमी झाली आहे.
कोरोनाची साथ संपून पुन्हा मासेमारीला सुरुवात होण्यास आणखी काही काळ जावा लागेल. त्याचा फायदा माशांना, समुद्र्रीजिवांना मिळणार आहे. कमी झालेली जलवाहतूक, घटलेले प्रदूषण या गोष्टी सागरी जिवांसाठी लाभदायक ठरल्या. वाढत्या प्रदूषणामुळे सागरी जिवांच्या अनेक जातींचे अस्तित्व धोक्यात आले होते. त्यांनाही या संकटातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक असलेले वातावरण लॉकडाऊनमुळे तयार झाले आहे. (वृत्तसंस्था)

सागरी जिवांच्या प्रजोत्पादनात वाढ होणार

जागतिक स्तरावर मासेमारी अतिप्रमाणात केली जात होती. त्याला लॉकडाऊनमुळे आळा बसल्याने आता काही माशांच्या जाती व सागरी जिवांच्या प्रजोत्पादनात वाढ होणार आहे.

औद्योगिकीकरणामुळे समुद्र्राचे पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होते. त्यामुळे समुद्राच्या पोटात वाढणाऱ्या अनेक वनस्पतींचेही नुकसान झाले होते. लॉकडाऊनमुळे या साºया जैवसाखळीला दिलासा मिळाला आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या इस्कॅप संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे.
 

Web Title: coronavirus: Coronavirus happy days for marine life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.