शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोनाच्या काळात चीननं दाखवली ताकद; अमेरिकेनं शक्तिप्रदर्शन करत दिला कडक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 09:50 IST

अमेरिकेच्या हवाई दल आणि नौदलाने जपानला लागून असलेल्या गुआम एअरबेसवरही शक्तिप्रदर्शन केले आहे.

कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या काळातच तैवान आणि जपानच्या समुद्राजवळ विमानवाहक युद्धनौका पाठवून शक्तिप्रदर्शन करणाऱ्या चीनला अमेरिकेनं आपली ताकद दाखवली आहे. आता अमेरिकेच्या हवाई दल आणि नौदलाने जपानला लागून असलेल्या गुआम एअरबेसवरही शक्तिप्रदर्शन केले आहे. यूएस एअरफोर्सचे बॉम्बर, प्राणघातक ड्रोन एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं युद्धसराव केला असून,  गुआम एअरबेसवर अमेरिकेचं सैन्य 'एलिफंट वॉक' करताना दिसले. शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून अमेरिकेने चीनला कडक इशारा दिला आहे.जाणून घ्या, एअरफोर्सचा 'एलिफंट वॉक' म्हणजे काय?जेव्हा एखाद्या हवाई दलाला हे कळले की शत्रू देश हल्ला करणार आहे, तेव्हा हवाई दल आपले लढाऊ विमान अशा स्वरूपात बनवते की ते फारच कमी वेळात आक्रमण करण्यास सक्षम असतात. या निर्मितीस एलिफंट वॉक असे म्हटले जाते. सोमवारी, यूएस एअरफोर्स आणि नेव्ही यांनी गुआममधील त्यांच्या अँडरसन एअरफोर्स तळावर डझनभर विमानांसह प्रदर्शन केले.

अमेरिकन एअरबेसच्या नाकाखाली चीनचा अड्डागुआम हवाई तळ हे पूर्व चीनपासून 1800 मैलांवर आहे. अमेरिकेने येथे आरक्यू ग्लोबल हॉक ड्रोन, पाच बी -52 बॉम्बर विमानं आणि हवाई टँकरच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन केलं आहे. यापूर्वी चीनने तैवानच्या जवळच आपली विमानं आणि युद्धनौका पाठवून तैवानला धमकावण्याचा प्रयत्न केला होता. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, चीनची विमानवाहक युद्धनौका लियोनिंग आणि अन्य 5 युद्धनौका प्रथम जपानला लागून असलेल्या मियाको स्ट्रॅटमधून गेल्या आणि नंतर तैवानजवळही आल्या होत्या. तैवानजवळ चीनचा युद्धसरावतैवानजवळून जात असताना चिनी सैनिकांनी युद्धसराव केला आहे. चीनने आपल्या या हालचालीने तैवानला धमकावण्याचा प्रयत्न केल्याची आता चर्चा आहे. प्रशांत महासागरात कार्यरत अमेरिकेच्या दोन यूएस नेव्ही विमान वाहक युद्धनौका यूएसएस रोनाल्ड रिगन आणि यूएसएस रुझवेल्ट या कोरोनाच्या विळख्यात सापडल्यानंतर चीननं हे पाऊल उचललं आहे.  यामुळे संपूर्ण प्रशांत महासागरात चीनला मोठी संधी मिळते आहे. याचा फायदा घेऊन चीन इतर देशांना चिथावणी देत आहे. अमेरिकेच्या 600 नौदलाच्या सैनिकांना कोरोनाची बाधाअमेरिकन विमानवाहू जहाज यूएसएस रुझवेल्टवरचे 600 नौसैनिक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. इतकेच नाही तर सोमवारी एका नौसैनिकाचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, यूएसएस रेगन जहाज सध्या जपानच्या योकोसुका येथे आहे आणि त्याची डागडुजी सुरू आहे. तथापि, त्याचे क्रू मेंबर्सही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. नुकतीच अमेरिकन सैन्य तैवानजवळ समुद्रावरही सक्रिय होती. शुक्रवारी अमेरिकेच्या नौदलाचे मार्गदर्शित क्षेपणास्त्र नाशक तैवानमार्गे गेले. त्याच दिवशी चीनची लढाऊ विमानाने तैवानजवळ सराव करत होती.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या