शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : इटलीत कोरोनाचा कहर, दिवसभरात 627 जणांचा मृत्यू, तर यूकेमध्ये लॉकडाऊन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 08:31 IST

युरोपमधील अनेक देशांमध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने होत असून, कोरोना विषाणूला रोखण्याचे प्रयत्न अपुरे पडत आहेत.

रोम/ लंडन - कोरोना विषाणूने चीननंतर आता युरोप खंडाला विळखा घातला आहे. युरोपमधील अनेक देशांमध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने होत असून, कोरोना विषाणूला रोखण्याचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक फटका इटलीला बसला असून, आज दिवसभरात इटलीमध्ये तब्बल 627 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे युनायटेड किंग्डममध्येही कोरोनामुळे बिकट परिस्थिती ओढवली असून, पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. कोरोना व्हायरसने जगभरात रौद्र रुप धारण केले असून १७९ देशांना विळखा घातला आहे. आतापर्यंत 10049 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अडीज लाखांच्या आसपास रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, इटलीमध्ये कोरोना विषाणूने आता चीनपेक्षा भयानक रूप धारण केले आहे. कोरोना विषाणूमुळे इटलीमध्ये दररोज शेकडो लोकांचा मृत्यू होत आहे. दोन दिवसांपूर्वीच इटलीमध्ये एका दिवसात 475 लोकांचा मृत्यू झाला होता. तर आज इटलीमध्ये दिवसभरात 627 जणांचा मृत्यू झाला आहे. आता इटलीमध्ये सुमारे चार हजार जणांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. 

दुसरीकडे युनायटेड किंग्डममध्येही आता कोरोना विषाणूचा प्रभाव दिसू लागला आहे. युनायटेड किंग्डममध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले सुमारे चार हजार रुग्ण सापडले आहेत. तर 177 जणांचा मृत्यू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर युकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी मोठा निर्णय घेतला आहे. जॉन्सन यांनी देशात लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. तसेच देशातील कॅफे, पब, रेस्टॉरंट्स बंद राहतील, अशी घोषणा केली आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याItalyइटलीEnglandइंग्लंड