शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus कोरोनाची लस चोरण्यासाठी चीनचा खटाटोप; अमेरिकेवर मोठा सायबर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 14:03 IST

अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने चीनवर हा आरोप लावला आहे. चीनला अमेरिकेने कोरोनाबाबत केलेले संशोधन आणि त्यावर शोधल्या जाणाऱ्या औषधांची माहिती हवी आहे.

वॉशिंग्टन : चीनने हेतूपुरस्सर कोरोना व्हायरसची माहिती जगापासून लपवून ठेवल्याने जगभरात कोरोना पसरला आणि आर्थिक नुकसानीबरोबर लाखो जीव गेल्याचा आरोप अमेरिकेने चीनवर केला होता. यावरून चीनी व्हायरस संबोधल्याने दोन देशांमध्ये वाक् युद्धही रंगले होते. आता या युद्धाने सायबर हल्ल्यांपर्यंत मजल मारली असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. 

अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने चीनवर हा आरोप लावला आहे. चीनला अमेरिकेने कोरोनाबाबत केलेले संशोधन आणि त्यावर शोधल्या जाणाऱ्या औषधांची माहिती हवी आहे. यामुळे त्यांनी ही माहिती मिळविण्यासाठी सायबर हल्ला केला आहे. अमेरिकेच्या एजन्सी आणि मेडिकल संस्थांवर सायबर हल्ले वाढू लागले आहेत. यमुळे हॉस्पिटल, रिसर्च लॅब, हेल्थ केअर प्रोव्हायडर आणि फार्मासिटीकल कंपन्यांवर याचा मोठा परिणाम होत असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. 

एका अधिकाऱ्याने सीएनएनला सांगितले की, डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड ह्यूमन सर्व्हिसेजवर दररोज सायबर हल्ले होऊ लागले आहेत. जगात दोन जागा अशा आहेत की या डिपार्टमेंटवर अशा प्रकारचे हल्ले करू शकतात. त्यापैकी चीनवर आमचा संशय असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दुसरा देश रशिया असे या अधिकाऱ्याला अप्रत्यक्षपणे म्हणायचे होते. 

डिपार्टमेंट ऑफ जस्टिसनुसार चीनी हॅकरांना अमेरिकेच्या हॉस्पिटल आणि लॅबवर हल्ला करायचा आहे. याची चिंता प्रशासनाला आहे. जॉन डेमर या अधिकाऱ्याने सांगितले की, सध्या कोरोना व्हायरसच्या लसीवर बायोमेडिकल संशोधन सुरु आहे. त्याशिवाय आता काही कोणत्यारही देशाला महत्वाचे नाहीय. जो देश या महामारीचे रामबाण औषध शोधून काढेल त्याची इतिहासात मोठी नोंद होणार आहे. यामुळे चीन यासाठी प्रयत्नशील असण्याची शक्यता आहे. त्या देशाच्या यशाचे गुणगाण जगभर गायले जाणार आहे. गेल्या महिन्यात सायबर सिक्युरिटी ग्रिप फायर आय नुसार चीनच्या APT41 ग्रुपनेब्रॉडकास्ट कँपेन चालविले होते. अमेरिका आधीपासूनच चीन, रशिया, ईरान आणि उत्तर कोपियावर सायबर हल्ले केल्याचे आरोप लावत आला आहे.  

अन्य बातम्या वाचा...

CoronaVirus धोक्याचे! कोरोना दिवसेंदिवस अवतार बदलतोय; ११ वे रुप खूपच खतरनाक

यही मौका है! नितीन गडकरींनी सांगितला चीनवर 'वार' करण्याचा प्लॅन

CoronaVirus शारीरिक संबंधाद्वारे कोरोना पसरतो? वुहानमध्ये संशोधन

एक नाही, तर तीन प्रकारच्या कोरोनाचा देशावर हल्ला; गुजरातचे संशोधक धास्तावले

दिलासा! कोरोना संकटात रोजगार बुडाला? ही सरकारी बँक देणार कर्ज

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाchinaचीनcyber crimeसायबर क्राइम