शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus In China : कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटनं वाढवलं चीनचं टेन्शन, धास्तावलेल्या ड्रॅगननं घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 18:17 IST

CoronaVirus In China : कोरोनाच्या डेल्टा प्रकाराची नवीन प्रकरणे चीनमध्ये झपाट्याने दिसून येत आहेत, याचा सामना करण्यासाठी चीन सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे. 

कोरोना व्हायरसच्या नव्या लाटेने चीनमध्ये कहर केला आहे. यामुळे भयभीत झालेल्या चीनने आता अल्पवयीनांनाही लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या डेल्टा प्रकाराची नवीन प्रकरणे चीनमध्ये झपाट्याने दिसून येत आहेत, याचा सामना करण्यासाठी चीन सरकारने हा निर्णय घेतला आहे. 

गेल्या दोन आठवड्यांत चीनच्या सुमारे 18 प्रांतांमधून 450 नवे रुग्ण समोर आले आहेत. एक काळ होता जेव्हा चीनमध्ये कोरोना रुग्ण जवळजवळ संपले होते. मात्र, पुन्हा एकदा कोरोना रुग्ण आढळू लागल्याने चिंता वाढली आहे. यामुळे चीनने पुन्हा एकदा अनेक शहरांमध्ये कडक निर्बंध लादले आहेत आणि कोट्यवधी लोक लॉकडाऊनमध्ये गेले आहेत.

चीनमध्ये बुधवारी एका दिवसात 71 नवे रुग्ण आढळून आले. या वर्षात जानेवारीनंतरची ही चीनमधील सर्वाधिक संख्या आहे. पूर्व चीनच्या नानजिंग शहरापासून कोरोनाची ही नवी लाट सुरू झाली आहे. आता पुन्हा बीजिंग ते वुहानपर्यंत कोरोना रुग्ण समोर येऊ लागले आहेत.

Corona Virus: कामाची बातमी! लसीनंतर आता येतेय 'अँटीव्हायरल गोळी'; जाणून घ्या, कोरोनावर किती प्रभावी

वुहान शहर हे जगातील कोरोना संसर्गाचा बालेकिल्ला मानले जाते. वुहानच्या प्रयोगशाळेतूनच कोरोनाचा संसर्ग जगभर पसरला, अशीही एक थेअरी आहे. असे म्हटले जाते की 2019च्या शेवटच्या महिन्यांत येथून कोरोनाची सुरुवात झाली.

12 ते 17 वर्षे वयोगटातील लोकांची लसीकरण मोहीम -दरम्यान, चीनने या संकटाचा सामना करण्यासाठी नानजिंग, झेंग्झौ आणि वुहानच्या प्रत्येक नागरिकाची कोरोना चाचणी करायचे ठरविले आहे. कोरोना चाचणीची ही चौथी फेरी सुरू आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांनी अल्पवयीन मुलांचेही लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारचे म्हणणे आहे, की यामुळे संसर्ग टाळण्यास मदत होईल. चीनच्या शिक्षण मंत्रालयाने मंगळवारी जारी केलेल्या आदेशात, 12 ते 17 वर्षे वयोगटातील लोकांची लसीकरण मोहीम आता देशभरात राबवली जावी, असे म्हटले आहे. चिनी माध्यमांनुसार, 12 ते 17 वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Corona Vaccine: मोठी बातमी! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटवर लस कितपत प्रभावी? द लँसेटच्या रिपोर्टनं वाढवलं जगाचं टेन्शन

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसchinaचीन