शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: अवघे जग व्हेंटिलेटरवर ठेवून चीनमध्ये ब्लॉकबस्टर सिनेमे सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 19:50 IST

चीनमध्ये वातावरण निवळत असताना आता जगाला कोरोनाने ग्रासले आहे. भारतामध्ये ९००० सिनेमागृहे बंद करण्यात आली आहेत.

बिजिंग : चीनमधील कोरोना व्हायरसचा कहर आटोक्यात आल्यानंतर तेथील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. यामुळे चीनमधील जवळपास दोन महिन्यांपासून बंद असलेली चित्रपटगृहेही सुरु करण्यात येत आहेत. चीनचे मुख्य शहर शांघायमध्ये २०० हून अधिक थिएटर्स उघडण्यात येत आहेत. 

चीनमधील अन्य भागातील 700 थिएटर्स उघडण्यात आली असून तेथे ब्लॉकबस्टर सिनेमांच्या तिकिटावर मोठी सूट सरकरानेच देऊ केली आहे. या सर्व चित्रपटगृहांमध्ये जुने ब्लॉकबस्टर सिनेमे दाखविण्यात येणार आहेत.शांघाय प्रशासनाने थिएटर उघडण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये प्रेक्षकांना प्रवेश करताना शरीराचे तापमान तपासावे लागणार आहे. तसेच दोन जागांमधील अंत देखील कमीतकमी १ मीटर ठेवायचे आहे. 

चीनमध्ये वातावरण निवळत असताना आता जगाला कोरोनाने ग्रासले आहे. भारतामध्ये ९००० सिनेमागृहे बंद करण्यात आली आहेत. पीव्हीआर सिनेमाचे कार्यकारी अध्यक्ष कमल ज्ञानचंदानी यांनी सांगितले की आम्ही लॉकडाऊनचे समर्थन करतो. देशभरात पीव्हीआरच्या ८५४ स्क्रीन आहेत. याशिवाय भारतात डिस्ने चॅनलने व्हिडिओ ऑन डिमांडच्या धर्तीवरील डिस्ने प्लसचे लाँचिंग पुढे ढकलले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनIndiaभारतTheatreनाटक