शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
6
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
7
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
8
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
9
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
12
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
15
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
16
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
18
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
19
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
20
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का

Coronavirus: कोरोना लसीची चाचणी दुसऱ्या टप्प्यात; अहवालाकडे संपूर्ण जगाचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 15:46 IST

इटली, इराक, अमेरिकासह  भारतात देखील दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

चीनच्या वुहान शहरातून सुरु झालेला कोरोना व्हायरस जागतिक महामारी बनला आहे. चीनच्या वुहान शहरातून कोरोना कमी होत असून जगातील अन्य देशात दिवसेंदिवस या व्हायरसचा प्रसार वाढत चालला आहे. इटली, इराक, अमेरिकासह  भारतात देखील दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

कोरोनामुळे आतापर्यत जगभरातील आतापर्यंत 119,718 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 1,925,528 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे कोरोनासारख्या संकटावर मात करण्यासाठी सर्व देशातील सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. तसेच कोरोनाच्या उपचारासाठी लसीची चाचणी देखील अनेक देशात करण्यात येत आहे. परंतु चीन करत असलेल्या कोरोना लसीची चाचणी आता दुसऱ्या टप्प्यावर पोहचली असल्याची माहिती समोर आली आहे.

'ग्लोबल टाईम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोनाच्या लसीची चाचणीत चीन आता दुसऱ्या टप्प्यावर पोहचला आहे. चीनने या चाचणी प्रक्रियेत संशोधकांनी जेनेटीक इंजिनिअरिंग पद्धतीचा वापर केला. तसेच चाचणीसाठी  जवळपास ५०० लोकांची निवड केली आहे. लस चाचणीच्या पहिल्या टप्प्यात म्हणजेच क्लिनिकल ट्रायलमध्ये सुरक्षिततेचा आढावा घेण्यात आला होता. ज्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात लसीच्या कार्यक्षमतेची पडताळणी केली जाणार आहे. मार्च महिन्यात क्लिनिकल ट्रायल पार केल्यानंतर आता मानवी चाचणीच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेला चीन हा आतापर्यंतचा पहिला देश असल्याचे सांगण्यात आहे. त्यामुळे चीनच्या या कोरोना लसीच्या अहवालाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत 119,718 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 1,925,528 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 452,177 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. अमेरिका, चीन, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

दरम्यान, राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 2455 वर पोहोचला आहे. सोमवारी एका दिवसात कोरोनामुळे 11 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 160 झाली आहे. तसेच देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजार 741 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासात देशभरात कोरोनाचे नवे 905 रुग्ण सापडले आहेत. तर 51 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनामुळे आतापर्यंत 360 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1221 जण बरे झाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतchinaचीनAmericaअमेरिकाItalyइटली