शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

ब्राझीलच्या राष्ट्रपतींनाही बघू दिला नाही फुटबॉलचा सामना; अधिकारी म्हणाले, आधी कोरोना लस घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 14:26 IST

Brazil president Jair Bolsonaro : राष्ट्रपती बोल्सोनारो यांनी अनेक कारणे सांगूनही त्यांना सामना पाहण्याची परवानगी दिली गेली नाही. त्यांनी अद्यापही कोरोना लस घेतलेली नाही.

ब्राझीलमध्ये (Brazil) कोरोना नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन केले जात आहे. यातून खुद्द तेथील राष्ट्रपतींनाही सूट दिली जात नाही. याचे ताजे उदाहरण म्हणजे, सँटोस विरुद्ध ग्रेमियो फुटबॉल सामना (Football Match) पाहण्यासाठी राष्ट्रपती जैर बोल्सोनारो (Jair Bolsonaro) आले होते. मात्र, त्यांनी कोरोना लस घेतली नसल्याने त्यांना अधिकाऱ्यांनी सामना पाहण्याची परवानगी दिली नाही. आधी आपण कोरोना लस घ्या, यानंतर पुढे सामना पाहू शकता, असे संबंधित अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींना सांगितले. यासंदर्भात, मेट्रोपोल्स न्यूज पोर्टलने पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये, राष्ट्रपती बोल्सोनारो म्हणताना दिसत आहेत, की मला फक्त सँटोसचाच खेळ बघायचा होता. पण ते म्हणाले, आपल्याला लस घ्यावी लागेल. असे का? 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फुटबॉल क्लबने निश्चित केले आहेत नियम -कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर, सँटोस विरुद्ध ग्रेमियो फुटबॉल स्पर्धेचा हा पहिलाच सामना होता. मात्र, हा सामना पाहण्यासाठी क्लबने नियम निश्चित केले आहेत. यापूर्वीच क्लबने म्हटले होते, की येथे केवळ संपूर्ण लसीकरण झालेल्या अथवा नकारात्मक पीसीआर टेस्ट असणाऱ्या लोकांनाच प्रवेश दिला जाईल.

राष्ट्रपतींनी सांगितली अनेक कारणं -राष्ट्रपतींनी अनेक कारणे सांगूनही त्यांना सामना पाहण्याची परवानगी दिली गेली नाही. बोल्सोनारो रविवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ज्या लोकांनी लस घेतली आहे, त्यांच्या तुलनेत माझ्या शरिरात अधिक अँटीबॉडी आहेत. एवढेच नाही, तर अनेक लोकांच्या तुलनेत माझी रोगप्रतिकारक शक्तीही अधिक आहे. त्यांना कोरोनाचा धोका नाही.

राष्ट्रपती बोल्सोनारो यांनी अद्यापही कोरोना लस घेतलेली नाही -माध्यमांतील वृत्तांनुसार, राष्ट्रपति बोल्सोनारो सध्या साओ पावलो येथे सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. बोल्सोनारो यांनी कोरोना व्हायरस लसींसंदर्भात शंका व्यक्त केलेली असून अद्यापही लस घेतलेली नाही. जुलै 2020 मध्ये ते कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. यानंतर, काही आठवडे क्वारंटाइन राहून ते कामावर रुजू झाले होते. सध्या ब्राझीलमध्ये कोरोना मृतांचा आकडा सहा लाखपेक्षा अधिक आहे. 

टॅग्स :Brazilब्राझीलcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसFootballफुटबॉल