शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

coronavirus : अमेझॉनच्या जंगलात कोरोना, मूलनिवासी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 13:21 IST

अमेझॉनच्या घनदाट जंगलात जागतिकीकरणाची विषाणू छाया!

ठळक मुद्देनऊ जण बाधित असून आता पहिला बळी गेल्यानंतर जग एकदम खडबडून जागं झालं.

अमेझॉनचं जंगल आगीत होरपळलं. ते सा:या जगावर संकट होतंच. त्या संकटाचे ढग जरा उतरले नाही तोच, आता अमेझॉनच्या जंगलातही कोरोना व्हायरसने शिरकाव केला आहे.तसं ब्राझीलच्या आरोग्य मंत्र्यांनी जाहीरपणो मान्य केलं. मूलनिवासी असलेल्या अमेझॉनच्या जंगलात एकुण 9 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी सहांची प्रकृती स्थिर असली तरी एका 15 वर्षाच्या मुलावर आठवडाभर दवाखान्यात उपचार सुरु होते. मात्र सोमवारी त्याची प्राणज्योत मालवली. त्याला श्वसनाचा गंभीर त्रस होऊ लागला आणि त्यातच तो दगावला.या घटनेनं मूलनिवासी, आदिवासी जमातींमध्येही मोठय़ा भीतीचं वातावरण आहे. त्याचं कारण असं की, हे लोक जगापासून आजही लांब आहेत. त्यांनी विकसित, जागतिकीकरण झालेलं जग यापासून अजूनही दूर राहणंच निवडलं  आहे. मात्र त्याचा एक परिणाम असाही झाला की, जगभरातले लोक ज्या विषाणूंना ‘इम्यून’ झाले, म्हणजे त्यांची प्रतिकारशक्ती कालौघात ज्या विषाणूंसाठी तयार झाली, तशी या माणसांची झालेली नाही.त्यामुळे कोरोनाचा संसर्ग तिथं झाला तर त्यामुळे अन्य विषाणूंना, आजारांनाही ही माणसं बळी पडतील अशी भीती आहे.अमेझॉन जंगलात आजच्या घडीला विविध 300 वांशिक समूह मिळून साधारण साडे आठ लाख मूलनिवासी लोक आहेत. त्यापैकी 27 हजार लोक यानोमामी या वंशाचे असून त्यांच्याचपैकी एका 15 वर्षाचा मुलगा आता कोरोनापायी दगावला आहे.एकीकडे बाहेरच्या जगात या मूलनिवासींचा संपर्क वाढत आहे, दुसरीकडे त्यांनी  आधुनिक लसीकरण नाकारलं आहे. आमच्या गावात, आम्हाला लसीकरणाची गरज नाही असं म्हणून अनेक वांशिक समूहांनी आपण पारंपरिकच आयुष्य जगू असा निर्धार आजवर जपलेला आहे.बाहेरच्या जगाशी संपर्कच नव्हता तेव्हा इतरांपासून त्यांना कुठल्याच संसर्गाचा धोका नव्हता, मात्र आता ही माणसं अधिक लवकर संसर्गजन्य रोगांना बळी पडतील अशी शक्यता आहे. कारण तेच बाकी जगभरातल्या माणसांची प्रतिकारशक्ती ज्या विषाणूंना आता सहज मारते, तेच विषाणू या माणसांसाठी नवे असल्यानं त्यांचा धोका अधिक वाढतो.उत्तर ब्राझीलच्या बोआ विस्ता शहरात हा योनोमामी वंशाचा मुलगा दगावला. त्यांची लोकसंख्या आधिच कमी आहे. त्यांचा नेता डारिओ यावारीओमा सांगतो, ‘ डेंजरस डिसिज’, बट हाऊ टू फाईट?’हाच खरा प्रश्न आहे, मानवी अस्तित्वाच्या मूळर्पयत घेऊन जाणा:या या मूलनिवासी माणसांच्या जगण्याचा कल अजूनही निर्सगदत्त आहे. मानवाने उत्क्रांत होत जाताना स्वीकारलेल्या अनेक गोष्टी त्यांनी नाकारल्या आहेत. ते जंगल नियमाप्रमाणो जगतात, निसर्गात होणारे आजार आपल्या पारंपरिक  ज्ञानावर बरेही करतात. मात्र जागतिकीकरणातून आलेला हा विषाणू, त्याचा संसर्ग, आणि त्यातून होणारी गुंतागुंत कशी टाळायची हे मात्र या माणसांना कळत नाही.योनोमामी ही जमान ब्राझील आणि व्हेनेज्युएलाच्या जंगलात राहते. ती ही विखुरलेली. त्यामुळे तिथवर कोरोना कसा पोहोचला याचा माग घेणं सुरु आहे. एकुण 9 मुलनिवासींना संसर्ग झालेला असून त्यातला एक दगावल्यानं, या मूलनिवासींच्या आरोग्याची काळजी स्थानिक सरकार कशी घेत आहे, यासंदर्भात जगभरातला दबावही वाढला आहे.या जंगलात हा कोरोना व्हायरस बेकायदा खाणमजूर म्हणून काम करण्यामूळे पोहोचला असावा अशी प्रथमदर्शनी चर्चा आहे. हे खाणकामगार जंगलात राहतात, जवळच्या शहरात जातात , परत येतात, त्यांच्याकडून हा संसर्ग पोहोचला आणि मूलनिवासी विविध विषाणूंना ‘इम्यून’ नसल्यानं अल्पवयीन मुलगा त्यात दगावला अशी शक्यता आहे.उद्या  मूलनिवासींमध्ये हा आजार बळावलाच तर काय करणार असाही प्रश्न मोठा आहे.त्यांचा अधिवास असलेल्या परिसराला लागून जी शहरं आहेत, त्यात 90टक्के रुग्ण आजच कोरोनाचे आहेत.त्यांच्यापासून आणि अन्य माणसांपासूनही विलगीकरणात या मूलनिवासींना कसं ठेवणार, बाधा कशी टाळणार असे मोठे गहन प्रश्न सध्या ब्राझील सरकारसमोर आहेत.कोकमा जमातीच्या एक 29 वर्षीय तरुणीला सर्वप्रथम कोरोनाचं निदान झालं.त्यानंतर यंत्रणा हलली मात्र तोवर अन्य जमातींमध्येही हा प्रसार झाल्याचं दिसलं. नऊ जण बाधित असून आता पहिला बळी गेल्यानंतर जग एकदम खडबडून जागं झालं.पुढे काय? याचं उत्तर कुणाकडेच नाही.